फलटण चौफेर दि ५
फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय फलटणच्या सातव्या सत्रातील उद्यानदुतांनी ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत पिराचीवाडी येथे आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले होते .या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रणव सावंत, तसेच अध्यक्ष दिपक सावंत आदि उपस्थित होते.त्यानंतर डॉ. प्रणव सावंत यांनी आपले आरोग्य कसे निरोगी ठेवता येईल अशा अनेक मुद्द्यांवर त्यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी संतुलित आहार कसा घ्यावा त्याचे मार्गदर्शन करून गावातील ग्रामस्थांची आरोग्य तपासणी केली....
या उपक्रमासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रणव सावंत, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण, प्रा. जे. व्ही. लेंभे व समन्वयक प्रा.ए. डी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यान दूत वैभव कदम, यश गायकवाडं, विवेक क्षीरसागर, अजिंक्य काशिद, शिवम मेहेत्रे , मुकुंदराजे मगर ,यांनी हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला.