फलटण चौफेर दि ४
फलटण ग्रामीण पोलिसांनी मिरढे, सोनवडी बुद्रुक,वडले ता. फलटण गावच्या हद्दीत बेकायदेशीर अवैध दारूची विक्री केल्याप्रकरणी तिघा जणांवर गुन्हा दाखल केला आहे फलटण ग्रामीण पोलीस स्थानकातून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, मिरढे गावातील संशयित कैलास पांडुरंग चव्हाण रा नाईकबोमवाडी हा हॉटेल काजलच्या आडोशास उघड्यावर बेकायदेशीर दारूची चोरटी विक्री करत असताना त्याच्याजवळ ८४० रुपयांचा देशी दारूच्या २४ बाटल्या मिळून आल्या तसेच सोनवडी बुद्रुक ता फलटण गावच्या हद्दीत संशयित सुरेश भगवान चव्हाण रा सोनवडी बुद्रुक हा त्याच्या राहत्या घराच्या आडोशाला उघड्यावर बेकायदेशीर दारूची चोरटी विक्री करत असताना त्याच्याजवळ ५६० रुपयांचा देशी दारूच्या १६ बाटल्या मिळून आल्या व वडले ता फलटण गावच्या हद्दीची संशयित दादासो पांडुरंग सोनवलकर रा वडले हा पाटील नावाच्या शिवारात पत्र्याचे शेडचे आडोशाला उघड्यावर बेकायदेशीर दारूची चोरटी विक्री करत असताना त्याच्याजवळ ४५५ रुपयांचा देशी दारूच्या १३ बाटल्या मिळून आल्या असून तिघांवर फलटण घालून पोलिसांकात गुन्हा दाखल झाला आहे