फलटण चौफेर दि ५
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहूरी मान्यताप्राप्त फलटण एज्युकेशन सोसायटीचे श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय, फलटण अंतर्गत ग्रामीण कार्यानुभव कार्याक्रमांतर्गत बुधवार दिनांक ५ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता बिबी येथे उद्यानदुतांनी माती व पाणी परीक्षणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमास प्रमुख पाहूणे मा.डॉ. प्राजक्ता मेटकरी-खरात मॅडम या उपस्थित होत्या. तसेच कार्यक्रम अध्यक्ष मा. सरपंच सौ रुपाली बोबडे , तसेच सर्व आदरणीय ग्रामस्थ उपस्थित होते. यानंतर प्रमुख पाहुणे मा. डॉ. प्राजक्ता मेटकरी खरात मॅडम यांचा सत्कार सौ. रूपाली बोबडे यांनी केला. त्यानंतर या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. डॉ. प्राजक्ता मेटकरी खरात मॅडम यांनी मातीचा पोत, कमी होत चाललेल्या अनेक मातीविषयक पोत बदल जसे की जमिनीची सुपीकता, सेंद्रिय कर्ब जमिनीचा सामू, सूक्ष्म अन्नद्रव्ये, विद्राव्य क्षाराचे प्रमाण जपन्यासाठी सातत्याने माती परीक्षण का करवायचे ही माहिती त्यांनी दिली आणि अशा अनेक मुद्दांवर त्यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. तसेच मातीचे नमुने कसे गोळा करायचे, मातीचा योग्य समतोल नमुना कसा घ्यायचा यावर त्यांनी माहिती दिली व मार्गदर्शन केले. त्यानंतर सौ रुपाली बोबडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. उद्यानदुत प्रणव इंगवले यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रम संपन्न झाला या सर्व उद्यानदुतांना उद्यानविद्या महाविद्यालय, फलटणचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर सर, कृषी महाविद्यालय फलटण चे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण सर, कार्यक्रम अधिकारी प्रा. जे. व्ही. लेंभे सर आणि कार्यक्रम समन्वयक प्रा. ए. डी. पाटील सर यांचे उद्यानदुत विनायक खुणे, सुरज जमदाडे,उदय माने, ओमराज चव्हाण, प्रणव इंगवले,दिग्विजय दिवटे,यांना मार्गदर्शन लाभले.