फलटण चौफेर दि ५
संयुक्त कृती समितीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या ९ ऑगस्ट २०२४ रोजीच्या धरणे अंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज फलटण आगारात श्री दत्त मंदिर येथे घंटानाद आंदोलन करण्यात आले .
शासनाने एसटी कामगारांच्या प्रलंबित मागण्या लवकरात लवकर पुर्ण कराव्यात,सातवा वेतन आयोग व राज्य शासनाप्रमाणे वेतन ही एकच मागणी आहे,आज एकत्रितपणे सरकारच्या विरोधात एक होऊन आपल्या हक्काची वेतनवाढ आणि प्रलंबित थकबाकी मिळवून घेण्यासाठी सर्व रा प कामगारानी संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वात एकत्र येऊन लढा देणे हिच काळाची गरज आहे.असे आवाहन संयुक्त कृती समिती फलटण आगार चे वतीने करण्यात आले.
विरोधक आपल्या मागण्याविषयी एसटी कर्मचाऱ्यात संभ्रम निर्माण करत आहे दि.८,९ जुलै रोजी आझाद मैदानात उपोषण आंदोलनास कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला याची दखल घेऊन मंत्री दादा भुसे व मंत्री उदय सामंत यांनी चर्चेसाठी निमंत्रण दिले होते.. पण येणाऱ्या काळात निवडणूक आचार संहिता लागू होऊ शकते त्यामुळे वेळ काढू पणा न करता थेट मुख्यमंत्री साहेबांसोबत चर्चा व्हावी यासाठी ९ ऑगस्ट क्रांती दिनापासून महाराष्ट्रातील प्रत्येक आगारात धरणे आंदोलनास सुरुवात करायची आहे..
यातील प्रमुख मागणी राज्य शासकीय कर्मचाऱ्या प्रमाणे वेतन मिळावे.रु.४८४९ मधील शिल्लक रक्कम सरकारने त्वरित अदा करण्यात यावी कॅशलेस सेवा इनडोअर व आउट डोअर त्वरित सूरु करावी,महागाई भत्ता, घर भाडे भत्ता व वेतन वाढीचा फरकाची थकबाकी एक रकमे त्वरित अदा करावी,विद्यमान तसेच सेवानिवृत्त कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना सर्व प्रकारच्या बसेस मधून फरक न भरता वर्षभर मोफत पास मिळावा,सुधारित जुलमी शिस्त व आवेदन पद्धत मध्ये बदल करावा या अशा अनेक मागण्या कृती समितीच्या वतीने सरकारकडे करण्यात आलेले आहेत या कार्यक्रमास फलटण आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला यावेळी फलटण कामगार संघटनेचे सचिव योगेश भागवत, अध्यक्ष कैलास काटे, विभागीय कार्यकारणी सदस्य पोपट सोनवले, सुरेश आडागळे व संयुक्त कृती समितीचे सदस्य उपस्थित होते.