Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मुधोजी कॉलेज येथे एन. सी. सी. प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया संपन्न

 



फलटण चौफेर दि ११

मुधोजी कॉलेजच्या ग्राउंड वरती एन.सी.सी प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया पार पडली यामध्ये एकूण १०० कॅडेटची निवड करण्यात आली.

मंगळवार दिनांक ६ रोजी शैक्षणिक वर्ष २०२४ -२५ ची एनसीसी प्रथम वर्ष ( रेगुलर /FSFS ) प्रक्रिया मुधोजी महाविद्यालयाच्या ग्राउंड वरती पार पडली. या  प्रक्रियेसाठी अत्यंत काटेकोरपणे परीक्षा घेऊन प्रथम वर्षासाठी १०० कॅडेट ची निवड करण्यात आली . या निवड प्रक्रियेसाठी बावीस महाराष्ट्र बटालियन, एनसीसी युनिटचे कमांडिंग ऑफिसर कर्नल एम. ए. राजमन्नार सेना मेडल , ॲडम  ऑफिसर कर्नल नागेंद्र पिल्लेई, सुभेदार मेजर तानाजी भिसे, ट्रेनिंग जेसीओ  संभाजी शिंदे आणि त्यांचा सर्व स्टाफ यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्रवेश प्रक्रिया पार पडली. 


 मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो.डॉ. पंढरीनाथ  कदम ,  मुधोजी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री.ज्ञानदेव देशमुख  , वरीष्ठ व कनिष्ठ विभागाचा सर्व स्टाफ यांनी एन.सी.सी प्रथम वर्षासाठी निवड  झालेल्या सर्व कॅडेटचे तसेच प्रवेश प्रक्रीया यशस्वी रित्या पूर्ण  केल्याबद्दल कॅप्टन संतोष धुमाळ व त्यांच्या टीमचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.