फलटण चौफेर दि २५फलटण तालुक्यातील निंभोरे गावाच्या हद्दीत पालखी महामार्गावरील नवीन उड्डाणपूल शेजारी सख्ख्या बहिण भावाच्या खून झाल्याची खळबळ जनक घटना घडली आहे हा खून कोणी व का केला याचा पोलीस तपास घेत असून घटनास्थळी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्मचारी पंचनामा करण्याची कारवाई करीत आहेत ज्यांचा खून झाला आहे त्यामध्ये पारधी समाजाच्या सीकाबाई तुकाराम शिंदे व सुमित तुकाराम शिंदे या दोघा सख्ख्या बहीण भावाचा समावेश आहे दोघांचेही मृतदेह फलटण येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून फलटण ग्रामीण पोलिसांचे पथक घटनास्थळी पंचनामा करण्याची कारवाई करीत असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे