Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

चारित्र्याच्या संशयावरून प्रियकराकडून सख्ख्या बहिण भावाची हत्या फलटण पोलिसांनी दहा तासात लावला गुन्ह्याचा छडा

 



फलटण चौफेर दि २५

फलटण तालुक्यातील निंभोरे गावाच्या हद्दीत पालखी महामार्गावरील नवीन उड्डाणपूला शेजारी दि २४ रोजी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास पारधी समाजातील सख्ख्या बहिण भावाचा धारदार शस्त्राने वार करून  व लाकडी दांडके डोक्यात मारून खून केल्याची घटना घडली आहे मयत शीतल तुकाराम शिंदे उर्फ शीतल रणजित फाळके (वय३५) व सुमित तुकाराम शिंदे (वय २०) दोघेही रा सुंदरनगर निंभोरे ता फलटण अशी खून झालेल्या सख्या बहीण भावाची नावे असून संशयित रणजीत मोहन फाळके (वय ४५) सध्या निंभोरे ता फलटण मूळ रा सातारा  ता कोरेगाव याला फलटण ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे

याबाबत फलटण ग्रामीण पोलीस स्थानकातून मिळालेले अधिक माहिती अशी, 

फलटण लोणंद पालखी महामार्गावरील उड्डाणपुलाजवळ  मयत  शीतल तुकाराम शिंदे उर्फ शीतल रणजित फाळके हीने दोन वर्षापूर्वी तिचा पहिला नवरा कनव-या भिम-या पवार रा. वाळवा, जि. सांगली यास सोडुन देऊन रणजित मोहन फाळके, मुळगाव सातारारोड, ता. कोरेगाव, जि. सातारा याचेबरोबर तिच्या आईवडीलांजवळ झोपडीमध्ये राहत होती. शुक्रवारी रात्री सुद्धा रणजित मोहन फाळके हा तिच्यासोबत झोपडीमध्ये झोपला होता. परंतु दोघांचे मृतदेह मिळुन आल्यानंतर त्याने तेथुन पलायन केले होते. पोलीसांनी त्यास सातारारोड, ता. कोरेगाव येथुन ताब्यात घेऊन त्याचेकडे विचारपुस केली असता त्याने सुरुवातीला दिशाभूल करणारी माहिती सांगितली. परंतु पोलीसीखाक्या दाखवताच त्याने दि. २५ रोजी मध्यरात्रीचे सुमारास शीतल ही झोपेतून उठुन परपुरुषाबरोबर कोठेतरी जात असल्याचे दिसल्यामुळे तो झोपडीतील चाकु घेऊन तिच्या मागोमाग गेला. काही अंतरावर गेल्यानंतर त्याने शीतलला गाठुन तिच्या छातीवर चाकु खुपसुन तिचा खुन केला. त्यावेळी तिच्यासोबत असलेला तिचा भाऊ सुमित तुकाराम शिंदे यास त्याने अंधारात न ओळखल्यामुळे त्याने तो परपुरुष आहे, असे समजुन त्याने त्याच्याही छातीत चाकु खुपसुन त्याचाही निघृण खून केला  संशयित रणजित मोहन फाळके, वय ४५ वर्ष यास अटक केली आहे. तपासामध्ये मयत बहीणभाऊ हे 'अनुसुचित जमाती या प्रवर्गातील असल्याचे व आरोपी रणजित मोहन फाळके हा 'खुल्या' प्रवर्गातील असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर अॅट्रॉसिटी कायद्यातील कलमांची वाढ केली आहे. श्री समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा, श्री राहुल धस उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण यांचे मार्गदर्शनाखाली श्री अरुण देवकर पोलीस निरीक्षक स्थागुशा सातारा, श्री सुनिल महाडीक पोलीस निरीक्षक फलटण ग्रामीण, सहायक पोलीस निरीक्षक नवनाथ रानगट, अशोक हुलगे, रोहित फार्णे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, मच्छिंद्र पाटील, गोपाल बदने, पोलीस अंमलदार मोहन हांगे, पांडुरंग हजारे, बबन साबळे, महादेव पिसे, संतोष सपकाळ, प्रविण फडतरे, अजित कर्णे, अरुन पाटील, शिवाजी भिसे, अमित माने, अविनाश चव्हाण, गणेश कापरे, ओंकार यादव, मोहन पवार, रोहित निकम, विशाल पवार, वैभव सावंत, केतन शिंदे, शिवाजी गुरव, अमृत कर्पे, वैभव सूर्यवंशी, नितीन चतुरे, संदीप मदने, अमोल जगदाळे, विक्रम बनकर, श्रीनाथ कदम, अमोल पवार, संजय देशमुख, अमोल देशमुख, संभाजी साळुंखे, विक्क्रम कुंभार, हनुमंत दडस, रशिदा पठाण, प्रिती काकडे, उर्मिला पेंदाम, भाग्यश्री सुरुम, श्रीकांत खरात, अरुधंती कर्णे, शिवराज जाधव सदरची कारवाई केली आहे. गुन्ह्याचा प्राथमिक तपास पोलीस निरीक्षक सुनिल महाडीक यांनी केला असुन पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस हे करीत आहेत.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.