Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

भाऊ एक आदर्श नातं

 



जीवनामध्ये खऱ्या अर्थाने सुखी व्हायचे असेल तर, कौटुंबिक जीवन सुखी व समाधानी असणे आवश्यक आहे, पैसा अथवा प्रतिष्ठा मिळवली आणि तुमच्या कौटुंबिक जीवनात काही कलह अथवा संघर्ष असतील तर, तुमच्या बाहेरच्या यशाला काही किंमत राहणार नाही. तुम्ही जीवनात पूर्णपणे सुखी होऊ शकणार नाही. कौटुंबिक जीवन सुखी करण्यासाठी आपण नेमके काय करायला हवे ? हे पाहण्यापूर्वी मानवाच्या कौटुंबिक जीवनात दिवसेंदिवस बदल होत गेले, पूर्वीच्या एकत्र कुटुंबात कुटुंबातील भाऊ-बहीण सर्वजण एकत्र राहत, काळानुसार कुटुंब पद्धतीमध्ये बदल झाले, विभक्त कुटुंब पद्धती अस्तित्वात आली.

स्वार्थ संपला की मनुष्य नकोसा होतो, हेच मुख्य कारण आहे,

आपल्याकडे रामायणाची कथा भावाभावातील नात्यांचा आदर्शाचा उच्चांक आहे, भावाभावातील उद्बोधक कथा जगाच्या पाठीवर कुठेच पाहायला मिळत नाही, म्हणून आज सार जग राम लक्ष्मणाची  मंदिर बांधत आहेत.

कुटुंबात थोरल्या भावाला वडिलांप्रमाणे दर्जा असतो, त्यांच्या अज्ञात राहणे मान्य करतात, परंतु आज भावा भावांमध्ये  भांडण दिसतात, सख्खे भाऊ असूनही एकमेकांशी बोलत नाहीत, माणसा माणसातील नाती दुरावत चालली आहेत.

भाऊ भावामध्ये जर प्रेम असेल एकी असेल तर त्या कुटुंबाकडे इतर वाईट नजरेने बघत नाहीत,

कुटुंबातील सर्व व्यक्तींना आधाराची प्रेमाची व मार्गदर्शनाची नितांत आवश्यकता असते, या सर्व गरजा कुटुंब व्यवस्थेमध्ये पूर्ण होतात. म्हणूनच आज २१ व्या शतकातील विकसित व आधुनिक जगामध्ये सुद्धा कुटुंब व्यवस्था बदलत्या स्वरूपात का होईना पण टिकून आहे, आपले कौटुंबिक जीवन सुखी करण्यासाठी कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने जर काही किमान पथ्य पाळली तर आपले कौटुंबिक जीवन सुखी समाधानी व आनंददायी होऊ शकेल.

भावभावातील नात्यांचा आदर्श आज अभावानेच पाहावयास मिळतो, ते भाग्य मला लाभले, आईचे माहेर भाडळे, ता‌. कोरेगाव जि. सातारा येथील दीक्षित कुटुंब, आईच्या कुटुंबात पाच भाऊ आणि दोन बहिणी, भाऊ भावांच्या आदर्शाने या एकत्र कुटुंबात आज पन्नास ते साठ माणसे असून, कुटुंबात एकूण आठ ते दहा डॉक्टर आहेत, कुटुंबातील मुले उच्चशिक्षित असून शासकीय, व इतर कंपनीमध्ये उच्चपदस्थ अधिकारी म्हणून कार्यरत आहेत, आज भाऊ भाऊ शासकीय खात्यातून सेवानिवृत्त झाले असले तरी, त्यांनी घालून दिलेल्या आदर्शाने कुटुंबातील मुले एकत्रपणे कुटुंब व्यवस्था चालवीत आहेत. कोरेगाव तालुक्यामध्ये दीक्षित कुटुंब एक आदर्श कुटुंब म्हणून त्यांची ख्याती आहे. 

जीवनात रामायणाचा भाऊ भावांचा आदर्श घ्यावा.



श्री रवींद्र परशुराम वेदपाठक साखरवाडी तालुका फलटण जिल्हा सातारा फोन ९९७०७४९१७७

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.