फलटण चौफेर दि २४ इंदापूर तालुक्यातील निमसाखर व निरवागी येथे काल रात्री आठच्या सुमारास वादळीवाऱ्यासह पाऊस झाला त्यामुळे निरवागी येथील रासकर मळा येथे डाळिंब बागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच निमसाखर येथे झाडे पडली आहेत निमसाखर ते विर वस्ती ला जाणार रस्तावर झाड पडल्यामुळे वाहतूक बंद झाली आहे तसेच निमसाखर येथे अर्धा एकर शेवग्याची बाग पडली आहेत त्यामुळे तोडणीस आलेल्या शेवग्याचे नुकसान झाले आहे