Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

फलटण तालुक्यात अवकाळीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची कारवाई सुरू- प्रांताधिकारी सचिन ढोले

 


फलटण चौफेर दि २४ फलटण तालुक्यातील बहुतांशी गावांना गुरुवारी सायंकाळी अवकाळी पावसाने वादळी वाऱ्यासह  जोरदार तडाखा दिला यामध्ये ज्या शेतकऱ्यांचे शेती पिकांचे, घरांचे, जनावरांच्या झालेल्या हानीचे आजच पंचनामे करण्याचे निर्देश तालुक्यातील मंडळ अधिकारी, तलाठी, कृषी सहाय्यक यांना देण्यात आले असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी दिली

  शासन नियमाप्रमाणे शेतकऱ्यांचे व नागरिकांचे घरांचे पिकांचे किंवा जनावरांचे जे काही नुकसान झाले असेल  भरपाई देण्यासाठी महसूल विभाग फलटण यांच्याकडून सर्व तालुक्याभरात आज पंचनामे सुरू असून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी त्या गावातील संबंधित तलाठी व कृषी सहाय्यक यांना संपर्क करण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी केले आहे



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.