फलटण चौफेर दि २५
लोणंद पोलीसांनी दुचाकी चोरणाऱ्या तिघांना अटक केली असून त्यांच्याकडून २ लाख २० हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे संशयित सचिन दादु पोटोळे वय २० वर्षे रा. दरुज ता. खटाव जि. सातारा ,अशोक शंकर पाटोळे वय २० वर्षे रा. दरुज त. खटाव जि. सातारा वअनिकेत रमेश जाधव १९ रा. दरजाई ता. खटाव जि. सातारा अशी अटक केलेल्यांची नावे आहेत
याबाबत लोणच पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहिती अशी,
लोणंद पोलीस स्थानकाच्या हद्दीत दुचाकी चोरीच्या अनेक घटना घडल्या होत्या याबाबत सुशिल भोसले, सहाय्यक पोलीस निरिक्षक व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अंमलदार यांनी सदर घडलेल्या गुन्हयांबाबत गोपणीय खब-यांमार्फत माहीती मिळवुन माहीतीचे आधारे यातील संशयतांना शोधून काढले
दिनांक २३ रोजी यातील दोन आरोपीचा ठावठिकाण मिळताच वरीष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुशिल भोसले, सहायक पोलीस निरिक्षक व गुन्हे प्रकटीकरण पथकाने यातील दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक विचारपुस केली असता त्यांनी व त्यांचा आणखी एक साथीदारांनी मिळून लोणंद गावचे हद्दीतील दोन मोटार सायकली चोरी केलेची कबुली दिली त्यांच्या ताब्यातून चोरी केलेल्या दोन मोटार सायकली व गुन्हा करतेवेळी वापरलेली एक स्प्लेंडर मोटरसायकल अशा तीन मोटार सायकली एकुण २ लाख २० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदर गुन्हयाचा तपास मा. पोलीस अधीक्षक सो सातारा समीर शेख, मा. अप्पर पोलीस अधीक्षक साो. आंचल दलाल मॅडम, मा. उपविभागीय पोलीस अधीकारी साो. राहुल धस यांचे मार्गदर्शनाखाली लोणंद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सुशिल भोसले, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोहवा. संतोष नाळे, सर्जेराव सुळ, विठ्ठल काळे, केतन लाळगे, तसेच सपोफ. पाडवी, पोहवा. नाना भिसे, विजय पिसाळ, बापुराव मदने, सिध्देश्वर वाघमोडे, अभिजित घनवट यांनी सदर कारवाई मध्ये सहभाग घेतला असुन मा. पोलीस अधिक्षक सातारा यांनी अभिनंदन केले