फलटण चौफेर दि २५
फलटण शहरात आज दि २५ रोजी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास मद्यधुंद अवस्थेत कंटेनर चालवून अपघात केल्याप्रकरणी फलटण शहर पोलीसांनी मद्यधुंद असणारा चालक संशयित देवीप्रसाद जगदेव यादव, रा. लबेदा, प्रतापगढ, उत्तर प्रदेश याला अटक केली आहे
याबाबत फलटण शहर पोलीस ठाणगातून मिळालेले अधिक माहितीनुसार,दि.२५ रोजी १८ चाकी ट्रेलर क्र. एमएच-४९-११२० या ट्रेलर चा चालक हा ट्रेलर चालवीत जात असताना, दुपारी १.३० वाजता अनंत मंगल कार्यालय, कोळकी, ता. फलटण येथे वाहनांना धडक दिल्याने, अल्टो कार क्र.एमएच-१२-सीडी-९५१७ या कार चे नुकसान झाले आणि कार मधील सोमनाथ श्रीधर माने, रा. जाधववाडी हे किरकोळ जखमी झाले तसेच उत्तम मारुती पेटकर, रा. नरसोबानगर, कोळकी यांच्या कुटुंबाच्या मालकीच्या छोटा महिंद्र युवराज कंपनीचा ट्रॅक्टर क्र.एमएच-११-बीए-०५४४ व त्या सोबत असलेल्या ट्रॉलीचे नुकसान झाले. सदर ट्रक चालक देवीप्रसाद जगदेव यादव हा ट्रेलर घेऊन फलटण शहरात पृथ्वी चौकातुन आला आणि क्रातीसिंह नाना पाटील चौकातील क्रातीसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्या भोवती असलेल्या कुंपणास धडकला. त्यामुळे सदर कुंपणाचे नुकसान झाले. सदर ट्रेलरचा चालक देवीप्रसाद जगदेव यादव याने मद्यधुंद अवस्थेत ट्रेलर चालविल्याची तक्रार उत्तम मारुती पेटकर, रा. नरसोबानगर, कोळकी यांनी दिल्याने ट्रेलर चालक देवीप्रसाद जगदेव यादव यास ताब्यात घेण्यात आले असुन त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून पुढील तपास पो.ना. हेमा पवार या करीत आहेत.