Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

पाणी हे जीवन....

 



पाण्याला आपण जीवन म्हणतो, तहान लागली आणि पाणी मिळालं नाही तर, आपला जीव कासावीस होतो, याची प्रचिती आपणास वारंवार येत असते, कुंडीतील रोपटे पाण्याशिवाय कोमेजून जाताना आपण पाहिलं असेल, एखाद्या मरगळलेल्या रोपट्याला आपण पाणी देतो, तेव्हा ते ताज तवान होतं पाणीच नसेल तर साऱ्या जीवनच कोमेजून जाईल, सर्वत्र रखरखीत वाळवंट पसरेल, म्हणूनच पाण्याला आपण एक शक्ती म्हणतो. पंचमहाभूतात त्याची गणना करतो, पाण्याचे पूजन करतो, त्याला जलदेवता, वरूण देवता, असे संबोधतो.

माणसाचं पाण्याच्या स्त्रोतांच इतकं घट्ट नातं आहे, की त्याने नद्यांना तलावांना सरोवरांना नाव दिले स्वतःची ओळख या स्तोत्राची जोडली नद्यांना देवता म्हणलं, त्यांची मंदिर बांधली, नद्यांचे पाणी माणसाने पवित्र तीर्थ मानलं, नदीच्या काठी त्याने तीर्थक्षेत्र बसवली, नद्या नद्यांची उगमस्थान, सरोवर, तलाव, समुद्राच्या असे सारे जल स्तोत्र मानवी संस्कृतीचे अविभाज्य घटक आहेत. याचे कारण पाणी हेच जीवन आहे. आपल्या चयापचय क्रियेत पाणी महत्त्वाचं आहे, आपल्या आरोग्याच्या दृष्टीने पाण्याला खूप महत्त्वाचे स्थान आहे, पाण्याशिवाय आपण शेती करू शकत नाही, पाण्याची आपल्याला दैनंदिन कशी किती व कोणकोणत्या कारणांसाठी गरज भासते, याचा विचार केला तर आपल्या जीवनातील पाण्याचे असत साधारण महत्त्व आपल्या लक्षात येईल.


असे पाणी दूषित होण्याची विविध कारणे आहेत, *lमोठमोठ्या कारखान्यांमध्ये अनावश्यक असलेले पाणी नद्या नद्यांमध्ये सोडले जाते, साहजिकच पाणी दूषित होते, वास्तविक अशा खराब पाण्याची विल्हेवाट ज्या त्या संस्थेने लावली पाहिजे, पण तसे न होता चांगले पाणी हे दूषित होते, वास्तविक हे पाणी मुकी जनावरे पीत असतात, त्यांच्या आरोग्यास धोका संभवतो, याचाही विचार केला जात नाही, पावसाचे पाणी शुद्ध असतं, पण हवेच्या प्रदूषणामुळे पावसाचे पडणार पाणी सुद्धा दूषित होऊ शकते, कंपनीतून बाहेर पडणारा धूरामुळे हवा दूषित होऊन संयोगामुळे पाणीही दूषित होते, मानव पाणी पिताना कसलाही विचार करत नाही, परंतु त्याने आरोग्यास धोका संभवतो, परंतु चातक पक्षी फक्त पावसाचे पाणी पितो, व त्याच्याकडे तो डोळे लावून बसलेला असतो, बहुदा पावसाचे पाणी शुद्ध असतं, म्हणूनच तो पावसाचे पाणी पीत असावा, मात्र हा पक्षी जर खरोखरच अस्तित्वात असेल तर आजच्या प्रदूषित हवेमुळे त्याला पावसाच्या अशुद्ध पाण्याचा आस्वाद घ्यावा लागत असेल,मानवी जीवनातही पाण्याची खूप नासाडी होते, काल भरलेले पाणी विनाकारण शिळे झाले म्हणून दुसऱ्या दिवशी ओतून दिले जाते, घराबाहेर शिंपडले जाते, जिथे सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळी नियमित पाणीपुरवठा केला जातो, तिथेही अशाच प्रकारे पाणी आधी साठवून नंतर ओतून दिले जाते, अशा अनेक कारणाने घराघरात पाण्याची गळती होते, पाण्याची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट बनत असताना पाण्याचा असा बेपर्वा वापर करणे योग्य आहे का ? याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे, व पाण्याचा काळजीपूर्वक वापर केला पाहिजे, पाण्याची चोरी हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे, ग्रामीण भागात व शहरी भागातही बेकायदा नळ जोड घेण्याचे प्रकार सर्रास घडतात, अर्धा इंच कनेक्शनची परवानगी असताना, संगनमताने एक इंची कनेक्शन बसविले जाते, त्यामुळे जास्त पाणी घेतले जाते, ही पाण्याची चोरी असते, मोठमोठ्या निवासी संकुलांमध्ये, टाऊनशिप मध्ये बेकायदेशीर कनेक्शन दिली जातात, बांधकामासाठी वापरले जाणारे पाणी अनाधिकृतपणे परस्पर नळ जोड करून वापरले जाते,

शेतीला मिळणाऱ्या पाण्यासाठी आज मात्र भांडण होत आहेत, गावागावांमध्ये तंटे उभे राहिले आहेत, कोण कोणाचे पाणी पळवत याविषयी चर्चा होत आहे, ज्या गावात पाणी नाही त्या गावात मुली देण्यास लोक तयार नाहीत, असे चित्र दिसत आहे, पाणी नाही म्हणून ग्रामीण भागातील लोकांचा शहराकडे जाण्याचा लोकांचा कल वाढत आहे.

वाढत्या दूषित हवामानामुळे वृक्षतोडीमुळे, भूगर्भातील पाणी म्हणजेच भूजल पातळी कमी होत आहे, साहजिकच भविष्यात पाण्याची कमतरता भासेल.

पाणी एक मौल्यवान, जीवनावश्यक वस्तू असून, त्याचे जतन संवर्धन करणे आपलं कर्तव्य आहे.


श्री. रविंद्र परशुराम वेदपाठक साखरवाडी ता  फलटण. जि. सातारा. फोन.९९७०७४९१७७

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.