फलटण चौफेर दि १७ - दुष्काळी भागातील शेतकरी हा हक्काच्या पाण्यापासून वंचित राहू नये,यासाठी अहोरात्र झटत केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा विकासनिधी आणून खऱ्या अर्थाने संपूर्ण फलटण तालुका ओलिताखाली आणण्यासाठी पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी शर्तीचे प्रयत्न करीत निरा देवधर योजना पुरतत्वाचा विढा उचलून प्रत्तेक शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी मनापासून प्रयत्न करणाऱ्या आपल्या हक्काच्या खासदाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे आपले कर्तव्य असल्याचे प्रतिपादन भाजपचे जेष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील यांनी केले.
ते खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या अथक प्रयत्नातून निरा देवधर पिढ्या न पिढ्या अडकलेल्या फलटण तालुक्यातील सत्तावन्न गावांचा दुष्काळ संपून निरा देवधर चा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल दुष्काळी भागातील जनतेशी "संवाद दौरा"आयोजित केला आहे त्या आयोजित दौऱ्यात पाटील अध्यक्षस्थानी असताना बोलत होते,यावेळी नरसिंह निकम, जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे ,निवृत्त सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, बजरंग गावडे अशोकराव जाधव, अमोल सस्ते. महादेव पोकळे तुकाराम शिंदे सुशांत निंबाळकर व इतर भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रल्हादराव साळुंखे पाटील यांनी सांगितले की फलटण तालुक्यातील या निरा देवधर मधील हक्काचे पाणी मिळू नये यासाठी अनेकांनी हा प्रकल्प रखडवला व आपली सत्तेची व मंत्रिपदाची खुर्ची शाबूत ठेवली,आणि सतत शेतकऱ्यांच्या माथी दुष्काळ मारला,व त्यांना निवडणुका आल्या की पोकळ घोषणा व थापा मारल्या,मात्र आता केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून माढा लोकसभा मतदारसंघाचे पाणीदार खासदार आपला दुष्काळी कलंक हटविण्यासाठी कसोशीने प्रयत्न करीत असून आज या निरा देवधरचा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी तब्बल ३२०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून येणाऱ्या काळात हा प्रकल्प पूर्ण होऊन आपल्या सत्तावन्न गावात खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होणार असून ज्यांनी आपल्याला आपल्या हक्काचे पाणी दिले अशा पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठीशी आपण सर्वांनी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन या मेळाव्यात केले आहे.