तरडगाव नवनाथ गोवेकर
तरडगाव तालुका फलटण येथील ग्रामपंचायत चे वार्डनिहाय आरक्षण ९ फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आले होते. मात्र जाहीर झालेल्या आरक्षणावर हरकती घेतल्याने फेरआरक्षण घेण्यात येणार असल्याने गावात सकाळपासून राजकीय चर्चा रंगल्या होत्या. दरम्यान सरपंच पद हे यापूर्वीच खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित जाहीर करण्यात आले आहे. तरडगाव तालुका फलटण येथील ग्रामपंचायतचे पंचवार्षिक निवडणूक पूर्व प्रभाग रचना व वार्डनिहाय आरक्षण ९ फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आले होते, मात्र यावर गावातून काही हरकती नोंदवल्या गेल्याने त्यावर पुन्हा ग्रामसभेतून आरक्षण सोडत जाहीर करण्यात यावी असा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यानंतर शुक्रवारी पुन्हा बैठक बोलवण्यात आली.या आरक्षण सोडती दरम्यान तीन ओबीसी प्रवर्गाच्या तर एक सर्वसाधारण महिलेसाठी अशा चिठ्ठ्या नायब तहसीलदार संजीवनी सावंत यांच्या उपस्थितीत दुपारी सुमारे साडेचार वाजता काढण्यात आल्या. यावेळी मंडलाधिकारी राहुल खाडे, गावकामगार तलाठी किशोर वाघ, ग्रामसेवक सुनील धायगुडे, पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. या आरक्षण सोडत मध्ये यापूर्वीचे अनुसूचित जातीचे आरक्षण कायम ठेवण्यात आले.वार्डनुसार आरक्षण पुढील प्रमाणे - श्रीराम वार्ड क्र १ - सर्वसाधारण महिला २, सर्वसाधारण खुला, विठ्ठल वार्ड क्र २ - अनुसूचित जाती पुरुष, ओबीसी सर्वसाधारण,सर्वसाधारण महिला, लक्ष्मी वार्ड क्र ३ - ओबीसी महिला,सर्वसाधारण महिला,सर्वसाधारण खुला, भैरवनाथ वार्ड क्र ४ - ओबीसी महिला,सर्वसाधारण महिला,सर्वसाधारण खुला, सावता वार्ड क्र ५ - ओबीसी सर्वसाधारण,सर्वसाधारण महिला,सर्वसाधारण खुला असे आरक्षण जाहीर करण्यात आले.