फलटण चौफेर दि ३१
सातारा जिल्ह्यातील बस स्थानकांमध्ये गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांचे दागिने व साहित्य चोरी करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले असून संशयित रुपाली अर्जुन सकट रा जयसिंगपूर, गीता संदीप भोसले रा जयसिंगपूर व सोनार रफिक अजिज शेख रा सांगली यांना अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडून तब्बल ३२ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे
समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा , आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी सातारा जिल्हयातील बस स्थानक परिसरात चोऱ्या करणाऱ्या आरोपींची माहिती काढून त्यांचचर प्रभावशाली कारवाई करण्याच्या सुचना पोलीस निरीक्षक अरुण देवकर, स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना दिल्या. पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांचे अधिपत्याखाली एक पथक तयार करुन त्यांना नमुद इसमांची माहिती काढून कारवाई करण्याचे आदेश दिले. पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांनी नमुद गुन्हा स्वतःकडे तपासास घेवून विश्वसनीय बातमीदार तसेच तांत्रिक विश्लेषनाद्वारे अज्ञात आरोपींची माहिती प्राप्त करण्याचा प्रयत्न केला.दि ६ रोजी पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना त्यांचे विश्वसनीय बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली की, Pickpocketing करणारी टोळी सातारा जिल्हयात कार्यरत असून सदरची टोळी जिल्हयातील बस स्थानक परिसरात गर्दीचा फायदा घेवून प्रवाश्यांचे सोन्याचे दागिणे व साहित्य चोरी करीत आहे. सदरच्या टोळीतील दोन महिला हया सातारा बस स्थानकाचे आवारामध्ये फिरत आहेत, अशी खात्रीशिर माहिती प्राप्त झाल्यानंतर त्यांनी पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे व त्यांचे पथकास नमुद महिलांना ताब्यात घेवून पुढील कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्या. नमुद तपास पथकाने सातारा बस स्थानक परिसरामध्ये सापळा लावून दोन्ही महिलांना महिला पोलीस अंमलदार यांचे मदतीने ताब्यात घेतले. पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील महिला पोलीस अंमलदार यांचे मदतीने दोन्ही महिलांचेकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी सातारा जिल्हयातील सातारा शहर, वडुज, फलटण शहर, कराड शहर, दहिवडी, कोरेगाव या बसस्थानकावर प्रवाश्यांच्या सोन्याच्या दागिण्यांची चोरी केली असल्याचे सांगीतले आहे. नमुद महिलांनी चोरी केलेले सोन्याचे दागिणे हे सांगली येथील सोनारांना विक्री केले असल्याचे सांगीतले. त्याप्रमाणे तपास पथकाने तात्काळ सांगली येथील एका सोनारास ताब्यात घेवून नमुद गुन्हयात अटक करुन त्यांचेकडून महिला आरोपींनी चोरी केलेले चालू बाजार भावाप्रमाणे ३२,०६,७००/- रुपये किमतीचे एकूण ५०.०९ तोळे सोन्याचे दागिणे हस्तगत करुन बस स्थानक परिसरात Pickpocketing करणारी टोळी ताब्यात घेवून रेकॉर्ड ब्रेक कारवाई केलेली आहे.
माहे नोव्हेंबर २०२२ पासून दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, मोटार सायकलचोरी, इतर चोरी असे एकूण
१६३ मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणले असून नमुद गुन्हयातील चोरीस गेलेल्या सोन्याच्या दागिण्यांपैकी ४४२ तोळे सोने (४ किलो ४२० ग्रॅम) असा एकूण २,७०,८०,७००/- रुपये (दोन कोटी, सत्तर लाख, ऐशी हजार, सातशे
रुपये) किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.
श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक, सातारा व श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, रविंद्र भोरे, रोहित फार्णे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, अमित पाटील, तानाजी माने, पोलीस अंमलदार सुधीर बनकर, विश्वनाथ संकपाळ, अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांवळे, मंगेश महाडीक, साबीर मुल्ला, सचिन साळुंखे, अमोल माने, मोहन नाचण, अजित कर्णे, हसन तडवी, मुनीर मुल्ला, सनी आवटे, राकेश खांडके, शिवाजी भिसे, मनोज जाधव, राजू कांबळे, प्रविण कांचळे, खप्नील दौंड, केतन शिंदे, धीरज महाडीक, मोहसनि मोमीन, महिला पोलीस अंमलदार दिपाली यादव, सौजन्या मोरे, शकुंतला सणस, आधिका वीर, तृप्ती मोहिते, अनुराधा सणस, काजल साबळे, मोनाली पवार, सुवणां पवार, आरती भागडे, दिपाली गुरव, पंकजा जाधव, पंकज बेसके, अमृत कर्पे, संभाजी साळुंखे, दलजित जगदाळे, विजय निकम, सायबर विभागचे अमित झेंडे यांनी सदरची कारवाई केलेली असुन कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक, सातारा व श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले