साखरवाडी गणेश पवार
५सर्कल (खामगाव) तालुका फलटण येथील ब्रिटिश कालीन नीरा उजवा कालव्यावरील पुलाने सुमारे शंभर वर्षांचा टप्पा पूर्ण केला असून १९२३ साली दगड व चुन्यात उभारलेल्या या पुलाला मागील वर्षीच शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे सध्या हा पुल वाहतुकीसाठी धोकादायक बनला असून पुलाचे कठडेही तुटल्याने या ठिकाणी भविष्यात फार मोठा अपघात होण्याची भीती नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे
ब्रिटिशांकडून सुमारे १०० वर्षांपूर्वी १९२३ साली वीर धरणापासून ३३ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या या पुलाची उभारणी करण्यात आली होती आता मात्र पुलाच्या बांधकामातील दगड निघू लागले असून भविष्यात पूल कोसळून मोठा अपघात होण्याचा धोका नाकारता येत नाही.
नीरा उजवा कालव्यावरील वाहतूकीसाठी व ओढ्या नाल्यांवर असणाऱ्या छोट्या मोठ्या मोरी पुलांचे नूतनीकरण झाले असून काही ठिकाणचे पूल मात्र सध्या धोकादायक स्थितीत आहेत त्यामधीलच ५ सर्कल(खामगाव) येथील हा पूल असून या पुलावरून रोज शेकडो छोटी, मोठी वाहने,साखरवाडीच्या कारखान्याची ऊस वाहतुक, फलटण लोणंदची बडेखान मार्गे साखरवाडी ला येणारी सर्व वाहतूक या पुलावरून होत असते.पुलाचा काही भाग आता खचू लागला असून कठड्यातील दगड निखळून पडले आहेत त्यामुळे भविष्यात पुल कोसळल्यास मोठा अपघात होण्याचा धोका असून या पुलाला पर्यायी पूल उभारण्याची मागणी प्रवाशी व वाहनधारकांमधून होत आहे