Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

भवानी माता डोंगर दुधेबावी येथील वृक्ष लागवडीची शासन पातळीवर दखल प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी केली पाहणी

 




फलटण चौफेर दि ३०

         फलटण तालुक्यातील  दुधेबावी येथील भवानी माता डोंगरावर व परिसरात २०२० पासून वृक्ष प्रेमी पर्यावरण रक्षक दुधेबावी  भूमिपुत्र सचिन सोनवलकर यांनी ४ हजार ५०० पेक्षा जास्त वृक्ष लागवड करून त्यांची जोपासना केली आहे त्यामुळे त्यांना विविध संस्थांचे पुरस्कार मिळालेले आहेत राष्ट्रीय वनश्री पुरस्कार, राष्ट्रीय पर्यावरण मित्र पुरस्कार व नुकताच नालंदा ऑर्गनायझेशन चा ट्री मॅन अवॉर्ड त्यांना घोषित झाला आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये  सचिन सोनवलकर यांचे उल्लेखनीय कार्य आहे वनराई जोपासण्यासाठी ते स्वखर्चाने, लोकवर्गणी व विविध स्वयंसेवी संस्था यांच्या सहकार्याने दुष्काळी परिस्थितीमध्ये निखराचे प्रयत्न करत आहेत.नुकतीच  सचिन ढोले प्रांत अधिकारी फलटण यांनी भवानी माता डोंगर परिसराला भेट देऊन सचिन सोनवलकर यांनी केलेले कार्य पाहून त्यांचे खूप कौतुक केले व आपल्या कार्यासाठी शासन स्तरावरून मदत उपलब्ध करून  दिली जाईल असे सांगितले... दुधेबावी ग्रामस्थांच्या वतीने  प्रांताधिकारी सचिन ढोले यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला यावेळी माजी सरपंच  त्रिंबकराव सोनवलकर तसेच कृषी सहाय्यक सुनील सोनवलकर ,सचिन जाधव, डॉ. संतोष कराडे, उत्तमराव सोनवलकर, भवानी मातेचे पुजारी  हनुमंत खरात ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.