Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

स्थानिक गुन्हे शाखेने दुचाकी चोरास अटक करून ४ लाख २० हजाराच्या ९ दुचाकी केल्या जप्त 202366

 




सातारा दि १४

स्थानिक गुन्हे शाखेला कराड बैलबाजार  याठिकाणी संशयित प्रतीक संजय माने (वय 20 वर्ष )रा किर्लोस्कर वाडी तालुका पलूस जिल्हा सांगली. सद्या मार्केट यार्ड कराड हा चोरीची मोटार सायकल विक्री करीता येथून येणार असल्याची   माहिती मिळाल्याने त्यांनी तपास पथकास नमुद आरोपीस ताब्यात घेवून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या, त्याप्रमाणे तपास पथकाने बैलबाजार परिसरात एका आरोपीस चोरीच्या मोटार सायकलसह ताब्यात घेवून त्याच्याकडे सखोल तपास केला असता त्याने त्याच्या साथीदारासह सांगली जिल्हयातील पलुस, कासेगांव, इस्लामपूर भागातून आणखी ८ मोटार सायकल चोरी केले असल्याचे सांगितल्याने, त्याच्याकडून सातारा व सांगली जिल्हयातील चोरीस गेलेल्या एकूण ९ मोटार सायकल किंमत रुपये ४,२०,०००/- रुपयेच्या हस्तगत करून ८ गुन्हे उघड केले आहेत सदर कारवाईमध्ये श्री समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा, श्री बापू बांगर, अपर पोलीस अधीक्षक सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली अरुण देवकर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा, पोउनि विश्वास शिंगाडे, पतंग पाटील, पोलीस अंमलदार सुधीर बनकर, संजय शिर्के, साधीर मुल्ला, मंगेश महाडीक, सचिन साळुंखे, सनी आवटे, अजित कर्णे, अमोल माने, राजु कांबळे, मनोर मुल्ला, शिवाजी भिसे, मनोज जाधव, थोरज महाडीक, मयूर देशमुख, वैभव सावंत, मोहसीन मोमीन, चालक संभाजी साळुंखे यांनी सहभाग घेतला असून कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे श्री समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा श्री बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.