तरडगाव(नवनाथ गोवेकर)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत सन २०२३ मध्ये माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा उपरोक्त निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर शुक्रवार, दिनांक ०२/०६/२०२३ रोजी दुपारी १२.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात आला. यामध्ये नायगाव नसरापूर येथील नवसह्याद्री गुरुकुल व ज्युनिअर कॉलेजचा १००% निकाल लागला आहे. या परीक्षेत एकुण ३० विद्यार्थी प्रथम विशेष प्राविण्य श्रेणीत तर १२ विद्यार्थी प्रथम श्रेणी मिळवून उत्तीर्ण झाले आहेत.
विद्यालयामध्ये अथर्व उमेश शिळीमकर याने शेकडा ९०.००% गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक मिळविला. द्वितीय क्रमांक वैष्णवी रामू पवार ८७.२०%. तृतीय क्रमांक ओम वाल्मिक दहिफळे ८६.४०%. चतुर्थ क्रमांक अनुष्का देविदास माने ८५.६०%. पाचवा क्रमांक आलीम आसिफ शेख ८४.००%. मिळवत घवघवीत यश संपादन केले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे नवसह्याद्री एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष पी. एन. सुके, ग्रुप डायरेक्टर सागर सुके, महाविद्यालयाच्या संचालिका सानवी सुके, प्राचार्य किरण पवार, सर्व प्राध्यापक वर्ग, शिक्षकेत्तर वृंद, पालक यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व विद्यार्थ्यांना पुढील उज्ज्वल भविष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.