साखरवाडी (गणेश पवार)
झडकबाईची वाडी तालुका फलटण गावाच्या हद्दीतून आवड नावाच्या शिवारातील गोठ्या मधून 95 हजार रुपये किमतीची तीन वर्षे वयाची गाई विनासंमती लबाडीने चोरून नेल्याप्रकरणी तिघा जणांविरोधात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून याबाबतची फिर्याद रेखा सोमनाथ शिंदे रा झडकबाईची वाडी यांनी दिली असून संशयित विनोद निवृत्ती खरात, संतोष शामराव सोनटक्के दोघेही राहणार भांडवली तालुका माण व सतीश रमेश माने राहणार तोंडले तालुका माण या तिघांवर गुन्हा दाखल झाला असून फिर्यादी रेखा शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक 4 फेब्रुवारी रोजी रात्री 8.30 ते 10.30 वाजण्याच्या सुमारास संशयतांनी फिर्यादी यांच्या संमतीशिवाय झडक बाईची वाडी येथील आवड नावाच्या शहरातील गोठयातून गाई चोरून नेल्याचे म्हटले आहे पुढील तपास पो हवा पिसे करीत आहेत