Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

अजित दादांची दर्यादिली ...!! लाडक्या लेकीचे घरी येऊन केले कोडकौतुक..!! Ajit dada

 


ते ताडताड बोलतात ..ते वसकन अंगावर येतात...ते चिडचिड करतात...मीडिया वाल्यांची तर अजिबात खैर करत नाहीत वगैरे वगैरे आक्षेप ज्यांच्यावर बेमालूमपणे चिकटवले आहेत तरीही संपूर्ण राज्यात आजच्या घडीला ते सगळ्यात जास्त चर्चेत व रोजच्या हेडलाइन मध्ये आहेत असे अजित दादा पवार सातारचे पालकमंत्री असल्या पासूनचे माझे मित्र.गेल्या वीस वर्षात अनेक चढ उतारात ही आमचे प्रेम अजिबात आटले नाही .पक्षीय व पत्रकारितेच्या पलीकडे हे ऋणानुबंध जाऊन पोहोचले त्याला अनेक प्रसंग कारणीभूत आहेत.पण तरीही दादा ना घरी बोलावण्याचा  प्रसंग २० वर्षात कधी आला नाही.अनेकदा खाजगी गप्पा त दादा नी मला त्या वरून चिमटे ही काढले आहेत.


लाडक्या लेकीने आणला योग ......!!


आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तींबाबत दादा ना नेहमीच जवळीक वाटते.इतरांना रोख ठोक वाटणारे दादा मला मात्र नेहमी हळवे वाटतात.नाती ,मैत्री जपण्याची त्यांची रीत न्यारी आहे. दोन वर्षापूर्वी माझी मुलगी शर्वरी राज्य सरकारच्या माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत राज्याच्या गुणवत्ता यादीत आली,सातारा जिल्ह्यात तर ती पहिली आली,तेव्हा अजित दादा राज्याचे उप मुख्यमंत्री होते.वर्तमान पत्रातील बातमी वाचून त्यांनी त्या रात्री स्वतःच्या फोन वरून शर्वरी चे अभिनंदन केले शिवाय पुन्हा पत्र पाठवून ही कौतुक केले.नुकताच १० वी बोर्डाचा निकाल लागला आणि वर्षभर कष्ट घेतलेल्या आमच्या लाडक्या लेकीने ९७ टक्के मार्कस मिळवून अत्यंत उत्तुंग कामगिरी केली.संस्कृत मध्ये तर १०० पैकी १०० गुण मिळवून तिने आमच्या कुटुंबाच्या डोळ्याचे पारणे फेडले.राजेंद्र चोरगे यांच्या गुरुकुल शाळेत टॉपर राहिलेल्याआमच्या मुलीसह अन्य टॉपर मुला मुलींचा सत्कार राज्याचे विरोधी पक्षनेते अजित दादा पवार यांच्या हस्ते करण्याचा कार्यक्रम राजेंद्र चोरगे आणि त्यांच्या टीम ने योजला.वडील म्हणून मला ही त्याचा अभिमान वाटला.दादा नी  ही गुरुकुल शाळेला भेट देण्याला होकार दिला.माझे घर गुरुकुल शाळेजवळ च आहे हे समजताच दादांनी त्यांच्या कार्यक्रम पत्रिकेत च माझ्या घरी भेट नमूद करून मला व माझ्या कुटुंबाला आश्चर्याचा धक्का दिला.तरी पण राज्यात एवढ्या घडामोडी वेगाने सुरू असताना दादा येतील की नाही या विषयी साशंकता होती मात्र शब्दाला पक्के  असलेल्या दादांनी दिलेल्या वेळेच्या आधीच गुरुकुल स्कूल गाठले.राजेंद्र चोरगे यांच्या शिक्षण पद्धतीचे ,शिक्षक वर्गाच्या संस्काराचे अजित दादा नी कौतुक केले.अनौपचारिक सत्कार सोहळ्यात माझ्या लेकीचे नाव ऐकताच व कुटुंब म्हणून मी व माझी पत्नी शीतल याना पुढे पाहताना दादा ना ही अभिमान वाटला.शर्वरी च्या गालावरून मायेने हात फिरवत त्यांनी तिला पुढे काय होणार ?? कुठे जाणार हे आणि असे बरेच प्रश्न विचारले.जाता जाता पोरगी आईवर गेलीय म्हणत दादांनी खळखळून हसत मला ही चिमटा काढला.गुरुकुल चा कार्यक्रम आटोपताच दादांचे पी. ए. व माझे मित्र सुनील मुसळे यांनी आग्रहाने दादांच्या गाडीत  मला पुढे बसवले,तिथेच नीश्चीत झाले अजित दादा आपल्या घरी नक्की  येत आहेत.त्या ३ मिनिटाच्या रस्त्यात २० वर्षाचा पट डोळ्यामोरुन तरळून गेला.शेवटी लाडक्या लेकीच्या उत्तुंग यशाने अजित दादा ना घरी आणले.

दादांना घरात पाहताना माझी आई भारावून गेली.शीतल ,शर्वरी ,स्नेह ,माझा भाऊ किरण ,आमचे कुटुंब ,अचानक समजले तरी तातडीने घरी आलेले माझे नातेवाईक व मित्र परिवार सगळ्यांनी च दादांचे मन भरून स्वागत केले.शर्वरी ला त्यांनी शाल पांघरली.डोक्यावर हात ठेवला,मायेने पेढा भरवला,मेरिट सोडायचे नाही असे ही सांगितले.सुमारे अर्धा तास त्यांनी घरातले घरपण अनुभवले ,घरातल्या कलाकृतींना दाद दिली,काही फोटोज् पी. ए.ना मुद्दाम घ्यायला लावले.दादा च्या ह्रुदयात असलेलाहा हळवा कोपरा ही आम्हाला अनुभवता आला.अजित दादा राज्याचे उप मुख्यमंत्री राहिले, एका प्रमुख राजकीय पक्षाचे ते राज्यातले मुख्य लीडर आहेत,राज्याचे विरोधी पक्षनेते आहेत, उद्याच्या मुख्यमंत्री पदाचे ते प्रमुख दावेदार आहेत असे असले तरी माझ्या साठी ते दर्यादिल मित्र आहेत...!! तीच दर्यादिली त्यांनी दाखवली ...!! आकाशाला गवसणी घालू पहात असलेल्या माझ्या मुलीने रोवलेल्या या झेंड्याला अजित दादा नी घरी आकस्मिक भेट देऊन लावलेला गोंडा आयुष्यभर स्मरणात राहील...!!

______हरिष पाटणे,सातारा.

(अभिमानाने म्हणतो शर्वरी चा बाबा)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.