फलटण चौफेर दि २०ऑगस्ट २०२५
वीर धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढल्यामुळे धरणातील पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. आज सोमवार दि. १९ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजता नीरा नदीच्या पात्रात सुरू असलेला विसर्ग वाढवून ५४ हजार७६० क्यूसेक्स इतका करण्यात आला असल्याची माहिती निरा उजवा कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी दिली.दरम्यान, पावसाची आवक कायम राहिल्याने आणि नदीपात्रात पाण्याचा विसर्ग आणखी वाढण्याची शक्यता असल्याने नीरा नदीच्या दोन्ही तीरावर राहणाऱ्या नागरिकांना प्रशासनाने सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. प्रशासनाकडून सर्व संबंधित विभाग व नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ब्रेकिंग बातमी!वीर धरणातून विसर्गात वाढ
August 18, 2025
0