फलटण चौफेर दि. १८ ऑगस्ट २०२५
महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाच्या आदेशान्वये नगरपरिषद / नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ करिता कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार फलटण नगरपरिषदेची प्रारूप प्रभाग रचना दिनांक १८ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट (दुपारी 3 वाजेपर्यंत) या कालावधीत जाहीर करण्यात आली आहे.सदर प्रभाग रचना कार्यालयीन वेळेत नगरपरिषदेच्या नोटीस बोर्डवर तसेच नगरपरिषदेच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध राहणार आहे. नागरिकांना या कालावधीत आपापल्या हरकती व सूचना नोंदविण्याचे आवाहन मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी केले आहे
इच्छुक नागरिकांनी हरकती / सूचना नगरपरिषद कार्यालयातील कर विभागामध्ये लेखी स्वरूपात सादर कराव्यात. यानंतर संबंधित नागरिकांना स्वतंत्रपणे सुनावणीची संधी देण्यात येणार असून त्यांचे म्हणणे ऐकून निर्णय घेतला जाईल. मात्र ३१ ऑगस्टनंतर आलेल्या हरकती व सूचना विचारात घेतल्या जाणार नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
फलटण नगरपरिषदेत प्रभाग रचनेची प्रारूप यादी आज होणार जाहीर- मुख्यधिकारी निखिल मोरे
August 17, 2025
0