संग्रहीत चित्र
फलटण चौफेर दि १८ ऑगस्ट २०२५
निरा खोऱ्यातील चारही प्रमुख धरणांमध्ये पावसामुळे पाणीपातळी समाधानकारक पातळीवर पोहोचली आहे. आज सकाळी सहा वाजेपर्यंतच्या नोंदीनुसार एकूण १.४३६ टीएमसी इतक्या पाण्याची आवक झाली आहे.भाटघर धरणात ७ मिमी पाऊस नोंदला गेला असून, २३.५०२ टीएमसी पाणी साठा म्हणजेच शंभर टक्के क्षमतेपर्यंत धरण भरले आहे. सध्या धरणातून वीज प्रकल्पाद्वारे १६१४ क्युसेक तर धरणाच्या सांडव्यातून ३५०० क्युसेक असे एकूण ५११४ क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे.
निरा-देवघर धरणात ४७ मिमी पाऊस झाला असून, ११.५२८ टीएमसी साठा (९८.२८%) आहे. धरणातून सांडव्यातून ४१७५ क्युसेक पाणी सोडले जात आहे.वीर धरणात केवळ १ मिमी पाऊस नोंदला गेला असून, सध्या ८.५३६ टीएमसी पाणी (९०.७४%) साठा आहे. धरणातून सकाळी ११ वाजता १८०० क्युसेक विसर्ग निरा नदीपात्रात सोडण्यात येणार आहे निरा डावा कालवा ७७५ व उजव्या कालव्यातून ७४९ क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे.
गुंजवणी धरणात १७मिमी पाऊस झाला असून, २.८२४ टीएमसी (७६.५३%) साठा आहे. धरणातून कोणताही विसर्ग करण्यात आलेला नाही. एकूण चारही धरणांमधील साठा ६.३९१ टीएमसी (९५.९९%) मागील वर्षी याच दिवशीचा साठा ४७.६०० टीएमसी (९८.४९%) पाणी साठा होतासंपूर्ण निरा खोऱ्यातील धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा असून, पुढील काही दिवस पावसाच्या परिस्थितीवर अधिक पाण्याचा विसर्ग अवलंबून राहणार आहे.