फलटण चौफेर दि २० ऑगस्ट २०२५
लोणंद-फलटण मार्गावरील मौजे कापडगाव येथे मंगळवारी दि १९ रोजी सायंकाळी झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.
लोणंद पोलीस स्थानकातून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अमीन बाबा खान शेख (वय ४७, रा. ढेबेवाडी, ता. पाटण) हे आपल्या मेहुण्यासोबत फिरोज दुलरखान दरवेशी (रा. पाचसर्कल, साखरवाडी) यांच्यासह दुचाकीवरून शिरवळहून साखरवाडीच्या दिशेने जात होते. दरम्यान, कापडगाव शिवारातील शिवार हॉटेलसमोर अज्ञात मालट्रकने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली.या धडकेत फिरोज दुलरखान दरवेशी गंभीर जखमी होऊन ठार झाले, तर अमीन बाबा खान शेख यांना गंभीर दुखापत झाली आहे.अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला असून, याबाबतची नोंद लोणंद पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.