Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

१४ ते २५ दरम्यान फलटणला मालोजीराजे व शिवाजीराजे स्मृती महोत्सवाचे आयोजन





फलटण चौफेर दि १२ मे २०२५

फलटण येथे ने दि. १४ मे ते २५ मे दरम्यान श्रीमंत मालोजीराजे व श्रीमंत शिवाजीराजे स्मृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आली.मालोजीराजे यांची ४७ वी पुण्यतिथी १४ मे रोजी व शिवाजीराजे यांची १०० वी जयंती २५मे रोजी असून त्या निमित्ताने श्रीमंत मालोजीराजे - प्रतिष्ठानच्या वतीने विविध कार्यक्रमांचे रोजी स्मृती महोत्सवाचे उद्घाटन व श्रीमंत मालोजीराजे स्मृती पुरस्कार वितरण विधान परिषदेचे माजी सभापती आ. रामराजे ना. निंबाळकर यांच्या हस्ते होणार आहे. यावर्षीचा श्रीमंत मालोजीराजे स्मृती पुरस्कार सहकार महर्षी स्व. तात्यासाहेब कोरे यांना जाहीर झाला आहे. दि. १५ रोजी श्रीकांत सावंत यांचा स्वरश्रुती हा जुन्या नव्या हिंदी मराठी गीतांचा कार्यक्रम. दि. १६ रोजी गिर्यारोहण काळाची गरज व तरुणाईला आवाहन या विषयावर दिलीप केशवराव ना. निंबाळकर यांचे भीमसेन जोशी यांचा संतवाणी कार्यक्रम. दि.१८ रोजी छत्रपती राजाराम महाराज, महाराणी ताराबाई साहेब आणि मराठ्यांचा स्वातंत्र्यलढा या विषयावर प्रा. गणेश राऊत यांचे व्याख्यान होणार आहे.




 या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजीवराजे ना. निंबाळकर हे असून दि.१९ रोजी मी जिजाऊ बोलतेय हा एकपात्री नाट्य प्रयोग व व्याख्यान डॉ. प्रतिभा जाधव निकम यांचे होणार आहे. दि. २० रोजी मकरंद टिल्ल यांचा हसण्यासाठी जगा जगण्यासाठी हसा हा १० रोजी हवामान बदलाची कृषी ग्रामीण विकासा पुढील आव्हाने या विषयावर पोपटराव पवार यांचे व्याख्यान. दि. २२ रोजी चैताली माजगावकर यांचा बोलक्या बाहुल्यांचा शो. दि. २३ रोजी फलटण एज्युकेशन सोसायटीच्या शिक्षक कर्मचाऱ्यांचा कलाविष्कार कार्यक्रम. दि. २४ रोजी फलटण एज्युकेशन सोसायटीच्या विद्यार्थ्यांचा कलाविष्कार कार्यक्रम. दि २५ रोजी स्मृती महोत्सव समारोप बक्षीस वितरण व सत्कार कार्यक्रम आ. रामराजे ना. निंबाळकर यांच्या हस्ते होणार आहेत

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.