फलटण चौफेर दि १२ सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजित दादा पवार गटाचे जिल्हाध्यक्ष तथा सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षामध्ये जाण्यासंदर्भातचा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर आज लगेचच त्यांनी अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे सुपूर्त केला