फलटण चौफेर दि १७ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यकाल भारत निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केला असून दि १५ ऑक्टोबर दुपार पासून आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झालेली आहे फलटण कोरेगाव विधानसभा अनुसूचित जाती साठी राखीव असणाऱ्या या मतदार संघात अतिशय उत्साहाने व भयमुक्त वातावरणात निवडणूक पार पडेल लोकशाही बळकट करण्यासाठी जास्तीत जास्त मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा व या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा फलटण चे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी पत्रकार परिषदेत केले यावेळी फलटणचे तहसीलदार डॉ अभिजीत जाधव , फलटण पालिकेचे मुख्याधिकारी निखिल मोरे फलटण शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक हेमंतकुमार शहा नायब तहसीलदार अभिजीत सोनवणे इत्यादी उपस्थित होते
निवडणुकीचा कार्यकाल स्पष्ट करताना दिनांक २२ ऑक्टोबर पासून निवडणूकिसाठी नामनिर्देशन पत्र भरता येईल दिनांक २९ ऑक्टोबर रोजी तीन वाजेपर्यंत नामनिर्देशन दाखल करता येईल दिनांक ३० रोजी नामनिर्देशन पात्रांची छाननी केली जाईल दि ४ नोव्हेंबर पर्यंत नामनिर्देशन अर्ज मागे घेता येतील आणि दिनांक २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल दिनांक २३ नोव्हेंबर ला मतमोजणी करण्यात येईल या निवडणुकीत जेष्ठ नागरिकांसाठी घरून मतदान करता येणार आहे यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली असून फॉर्म १२ डी भरून घेतला जाईल यामध्ये दिव्यांग व्यक्ती व जेष्ठ नागरिक यांचे गृहभेटीद्वारे मतदान घेण्यात येईल नामनिर्देशन पत्र दाखल करते वेळी उमेदवार व अनुमोदक यासह एकूण पाच व्यक्तींनाच प्रवेश मिळणार असून इतर कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही निवडणूक नामनिर्देशन कार्यालयाच्या १०० मीटर परिसरात फक्त तीनच वाहनांना प्रवेश देण्यात येईल असे यावेळी स्पष्ट करण्यात आले