Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

भिलकटी (फलटण) येथील बंद बस सेवा पुन्हा सुरू; ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण

 


फलटण चौफेर दि १६

फलटण तालुक्यातील भिलकटी गावात, बंद पडलेली बस सेवा पुन्हा सुरू झाल्यामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. शालेय विद्यार्थ्यांसह कामानिमित्त शहरात जाणाऱ्या नागरिकांना ही बस सेवा अत्यंत उपयोगी ठरणार आहे. यामुळे गावातील दळणवळणाची समस्या सुटली असून, ग्रामस्थांनी याचा मोठ्या प्रमाणात आनंद व्यक्त केला आहे.भिलकटी गावातील बस सेवा काही काळापूर्वी काही तांत्रिक कारणास्तव बंद करण्यात आली होती. परिणामी, विद्यार्थ्यांना आणि गावातील नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. मात्र, महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आणि फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण यांच्या प्रयत्नांमुळे ही बस सेवा पुन्हा नव्याने सुरू करण्यात आली असल्याची माहिती सरपंच सौ. सविता उत्तमराव पवार यांनी दिली.नागेश भंडलकर यांनी या महत्त्वपूर्ण घडामोडीबद्दल आनंद व्यक्त करताना सांगितले की, गावातील मुलांच्या शिक्षणासाठी व ग्रामस्थांच्या कामासाठी ही सेवा अत्यंत आवश्यक होती. या बस सेवेची आम्ही सर्वजण खूप दिवसांपासून प्रतीक्षा करत होतो. शेवटी आमच्या मागण्या मान्य झाल्या आणि आजपासून बस सेवा सुरू झाली.नव्याने सुरू झालेल्या बस सेवेचे स्वागत करण्यासाठी गावातील सर्व ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात पूजन कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमाला सरपंच सविता उत्तमराव पवार, ग्रामपंचायत सदस्य सौ. दिपाली भारत कांबळे, ग्रामपंचायत सदस्य सौ. दिपाली गोपाळ भंडलकर, ग्रामपंचायत सदस्य  प्रकाश राजाराम गोडसे, निवृत्त कृषी अधिकारी श्रीकांत डिसले,  माजी सरपंच रामचंद्र घोडके, माजी उपसरपंच शशिकांत डिसले,  दत्तात्रय भंडलकर, निळकंठ घोडके, गणेश ताकवले, राजेंद्र चोरमले, शंकर गोरे, भारत कांबळे, मिलन कांबळे, आत्माराम भंडलकर, सुनिल भंडलकर,तुकाराम कांबळे, मल्हारी भंडलकर, लालासो बोराटे, रामदास भंडलकर व इतर अनेक विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. गावातील महिलांनी पारंपरिक पोशाखात औक्षण केले, तर लहान मुलांनी आनंदात बसची आरती केली. ग्रामस्थांनी बस चालक आणि वाहक यांचे देखील सत्कार करून त्यांचे आभार मानले.बस सेवेच्या पुन्हा सुरूवातीमुळे भिलकटी गावातील ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.