फलटण चौफेर दि १६ --विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत निवडणूक आयोगामार्फत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी sveep (स्वीप ) अंतर्गत मतदारांमध्ये मतदान बाबत जनजागृती करण्याच्या अनुषंगाने २५५ फलटण (अ.जा) विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान जनजागृती बाबत उद्या दि १७ रोजी सकाळी ९ वाजता तहसील कार्यालय फलटण पासून महात्मा फुले चौक,गजानन चौक,उमाजी नाईक चौक, डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक,छत्रपती शिवाजी महाराज, क्रांती सिहं नाना पाटील चौक, पुण्यश्लोक आहिल्यादेवी चौक, डीएड चौक, गिरवी नाका ते तहसील कार्यालय याप्रमाणे करण्यात आले आहे तरी या मतदार जनजागृती रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात मतदार यांनी सहभाग होऊन मतदानाचा हक्क बजावा असे आवाहन सचिन ढोले निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांनी केले आहे मतदारांनी मोठ्या संख्येने या प्रभात फेरीमध्ये सहभागी व्हावे.मतदान जनजागृती व रॅली व प्रभात फेरीचे आयोजन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार फलटण डॉ. अभिजीत जाधव तसेच नगरपरिषद मुख्याधिकारी फलटण निखिल मोरे आणि नोडल स्विप अधिकारी सचिन जाधव यांच्या सह स्वीप टीम मार्फत करण्यात आले आहे यामध्ये फलटण तालुक्यातील महाविद्यालय कॉलेज मधील विद्यार्थी सहभाग नोंदवणार आहे