फलटण चौफेर दि १९ भिलकटी रेल्वेलाईन ता फलटण गावचे हद्दीत दि.१८ रोजी २ वाजण्याच्या सुमारास रेल्वेलाईन जवळ महिंद्र बोलेरो पिकअप गाडी क्र एमएच-१२-ए क्यू ३७७६ मध्येचालक संशयित इंद्रजित विश्वास पैठणकर वय ३५ रा ईरीगेशन कॉलनी माळेगाव ता बारामती जि. पुणे हा ३ जर्सी गाई कत्तलीसाठी घेवुन जात असताना आढळून आला त्याने गाईंच्या कत्तली पुर्वीची वैद्यकीय तपासणी व त्यांची चारा पाण्याची कोणतीही सोय केली नसल्याची फिर्याद मानद प्राणी कल्याण अधिकारी सौरभ सोनवले यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली असून संशयतावर ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे पुढील तपास पोलीस हवालदार पिसे करीत आहेत