Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

फलटण शहरात दुचाकीला डंपरची धडक वृद्धाचा मृत्यू

 



फलटण चौफेर दि १९ फलटण शहरातील बारामती फुल येथे आज सकाळी १०.३० वाजता दुचाकीला डंपर ने दिलेल्या धडकेत वृद्धाचा जागीच मृत्यू झाला याबाबत फलटण शहर पोलीस ठाण्यात डंपर चालकावर गुन्हा दाखल झाला असून हणमंत बाबुराव धुमाळ, वय ५९वर्षे, रा.  मठाचीवाडी, ता फलटण असे गुन्हा दाखल झालेल्या संशयीत चालकाचे नाव असून या अपघातामध्ये दिपक कृष्णा कदम वय ६५वर्षे, रा संजय गांधी नगर सस्तेवाडी ता फलटण यांचा गंभीर मार लागल्याने जागीच मृत्यू झाला

गुन्ह्याची फिर्याद जयदीप कदम यांनी दिली असून  फलटण शहर पोलीस स्थानकातून मिळालेली अधिक माहिती अशी, आज सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास दीपक कदम हे आपल्या दुचाकी  क्र एम एच ११  क्यू  २६९५ वरून फलटणहुन जिंती नाक्याच्या दिशेने जात होते त्यावेळी पाठीमागून आलेल्या डंपर क्रमांक  क्रमांक एम एच ४६ एहच ६६७७ वरील चालकाने डंपर रस्त्याच्या परिस्थिताकडे दुर्लक्ष करुन हयगयीने व अविचाराने भरधाव वेगात चालवुन  मोटारसायकलीस पाठीमागुन जोराची धडक देवुन सुमारे १० ते १५फुट पुढे फरफटत नेले व डंपरचे चाक अंगावरून गेल्याने त्यांच्या  मृत्यू झाला वडिलांचा मृत्यू व दुचाकीच्या नुकसानीस चालक जबाबदार असल्याचे  फिर्यादीत म्हटले आहे पुढील तपास सपोनि नितीन शिंदे करीत आहेत


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.