फलटण चौफेर दि ३०
लहानपणीच वडिलांचे छत्र हरपलेल्या व सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या साहिल गुलाब धुमाळ हा भारतीय सैन्य दलात भरती झाला आहे त्याचे मूळ गाव नायगाव ता कोरेगाव जि सातारा हे असून लहानपणीच वडिलांचे छत्र हरपल्याने वयाच्या दुसऱ्या वर्षापासून तो विंचूर्णी येथे त्याचा मामा जयदीप मनोहर निंबाळकर यांच्याकडे राहायला होता येथेच त्याचे प्रथमिक व माध्यमिक शिक्षण झाले त्याची सैन्य दलात निवड झाल्याने विंचूर्णी येथे मित्रमंडळी व कुटुंबीयांनी त्याचे फटाके फोडून व गुलाल उधळून जल्लोषात स्वागत केले यावेळी सुशांत निंबाळकर,रणजितनिंबाळकर वैभव गायकवाड,प्रशांत गायकवाड, राजेश धुमाळ, सुरज नलवडे, वैभव निंबाळकर, संजय भोईटे, सोमनाथ गायकवाड, धीरज निंबाळकर, प्रथमेश नलावडे, तेजस धुमाळ, विपुल भोईटे, विक्रम गायकवाड, शिवम निंबाळकर, बाळासो निंबाळकर, संजय निंबाळकर, शिवछत्रपती मित्र मंडळ सर्व कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते