गोखळी (प्रतिनिधी) फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील हनुमान माध्यमिक विद्यालयात गोखळी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच अभिजीत सुरेश जगताप यांनी हनुमान माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज गोखळी विद्यालयाची गरज ओळखून अत्याधुनिक व डिजिटल सी.सी.टीव्ही कॅमेरा भेट दिला नुकताच विद्यालयाचे प्राचार्य सुनील सस्ते सर यांच्याकडे छोटेखानी समारंभात स्वाधीन केला. यावेळी तो कॅमेरा श्रीकांत चव्हाण यांनी बसवून दिला. त्यामुळे संपूर्ण विद्यालय सी.सी.टीव्ही कॅमेऱ्याच्या सानिध्यात आलेले आहे. यावेळी प्राचार्य सस्ते सर म्हणाले, महाराष्ट्रात शैक्षणिक संस्थांमध्ये घडलेल्या घटनांची दखल घेऊन राज्य सरकारने सर्व विद्यालयाच्या प्रांगणात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आदेश शैक्षणिक संस्थांना दिले या अनुषंगाने आपल्या गावातील माध्यमिक विद्यालयाची गरज ओळखून विद्यालयालयास सीसीटीव्ही कॅमेरे भेट दिल्याबद्दल विद्यालयाच्या वतीने अभिजीत जगताप यांचे आभार मानण्यात आले. या यावेळी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष मनोज तात्या गावडे, खटकेवस्तीचे माजी सरपंच रघुनाथ ढोबळे, माजी उपसरपंच तानाजी सस्ते, माजी सरपंच अमित भैया गावडे,पै.दिपक चव्हाण, पप्पू जगताप, ज्ञानेश्वर शिपकुले,, बांधकाम व्यावसायिक सागर फडतरे, श्रीकांत चव्हाण संतोष दादा गावडे, सामाजिक कार्यकर्ते राधेश्याम जाधव, गोखळी सोसायटीचे संचालक उदयसिंह गावडे माजी उपसरपंच अभिजीत जगताप यांच्या सह. गोखळी व खटकेवस्ती गावातील मान्यवर विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.