Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

खिडकीच्या गजाला गळफास घेऊन विद्यार्थ्यांची आत्महत्या

 


फलटण चौफेर दि २७ पाडेगाव,  ता खंडाळा  येथील समता कनिष्ठ महा विद्यालयाच्या मुलांच्या वसतिगृहात अकरावीत शिकत असलेल्या देवराज प्रशांत धोतरे (वय १६, रा अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर) या विद्यार्थ्याने गळफास घेऊनआत्महत्या केली. या घटनेची नोंद लोणंद पोलीस स्टेशनमध्ये झाली आहे. आत्महत्या का व कशासाठी केली याचा पोलीस शोध घेत आहेत

याबाबत लोणंद पोलीस स्टेशनवरून मिळालेली अधिक माहीती अशी की बुधवारी रात्री  २.१५ वाजण्याच्या सुमारास पाडेगाव तालुका खंडाळा गावचे हद्दीत समता कनिष्ठ महाविद्यालयाचे मुलांचे वस्तीग्रह रूम नंबर १ मध्ये  देवराज प्रशांत धोतरे वय १६ वर्ष रा. अकलूज ता. माळशिरस जि सोलापूर हा शाळेच्या बाजूला असणाऱ्या वसतिगृहाच्या खोलीतच खिडकीच्या लोखंडी गजाला दोरउडीच्या मदतीने गळफास घेऊन मयत झाला आहे. तरी झाले मताचा तपास व्हावा.अशी वर्दी विशाल विजय जाधव यांनी लोणंद पोलीस स्टेशनला दिली असून लोणंद पोलीस स्टेशनमध्ये याची नोंद करण्यात आली आहे गुरुवारी प्राथमिक आरोग्य केंद्र लोणंद येथे  मृतदेहाचे शविच्छेदन करून देवराज याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला तसेच या घटनेचा अधिक तपास पो हवा भिसे हे करीत आहेत

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.