फलटण चौफेर दि. २७
साखरवाडी, ता फलटण येथील विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजनाचा कार्यक्रम आज दि २७ रोजी विधान परिषदेचे माजी सभापती आ श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते होणार आहे तसेच सायंकाळी ६ वाजता गणपती मंडप या ठिकाणी साखरवाडी जिल्हा परिषद गटातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस राजे गटाच्या वतीने करण्यात आले आहे या मेळाव्यामध्ये दोन महिन्यावर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने श्रीमंत रामराजे काय भाष्य करणार? याकडे संपूर्ण फलटण तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे साखरवाडी परिसरामध्ये आज होणाऱ्या लोकार्पण कार्यक्रमांमध्ये जिंती साखरवाडी रस्ता ५ कोटी रुपये, सुरवडी, पिंपळवाडी, होळ रस्ता २.५ कोटी रुपये, पिंपळवाडी फडतरवाडी ओढ्यावरील पूल २.२५ कोटी रुपये, जिंती होळ रस्ता १० लाख रुपये, फलटण जिंती रस्ता २.५ लाख रुपये भूमिपूजनामध्ये जिंती साखरवाडी बडेखान नांदल कॅनॉल पूल बांधणे ५ कोटी रुपये, प्राथमिक आरोग्य केंद्र साखरवाडी ४ कोटी रुपये, साखरवाडी जिंती साखरवाडी बडेखान रस्ता नांदल (भाग १) १ कोटी रुपये, फरतरवाडी साखरवाडी रस्ता २.५ कोटी रुपये,फडतरवाडी जिंती कोऱ्हाळे येथे पूल बांधणे ४६ कोटी रुपये, फडतरवाडी जिंती कोऱ्हाळे संरक्षण भिंत बांधणे २.८५ कोटी रुपये फलटण जिंती साखरवाडी रस्ता १०.५ कोटी रुपये या कामांचा समावेश आहे कार्यक्रमाला फलटण कोरेगाव चे आमदार दीपकराव चव्हाण, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन रघुनाथ राजे नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे सायंकाळी ६ वाजता होणाऱ्या कार्यकर्त्या मेळाव्याला साखरवाडी सह परिसरातील कार्यकर्ते व नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी राजे गट साखरवाडी यांच्यावतीने करण्यात आले आहे