फलटण चौफेर दि.६
नीरा खोऱ्यातील पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत आहे त्यामुळे खोऱ्यातील सर्वात मोठे भाटघर धरण १०० टक्के भरले असून धरणातून ८६३१ क्यूसेकने विसर्ग सुरू आहे भाटघर, वीर,नीरा देवघर व गुंजवणी धरणात आज दि.६ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत पाणलोट क्षेत्रात झालेला पाऊस, एकूण पाऊस आणि धरणातील पाणी साठे खालीलप्रमाणे
गुंजवणी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ४ मि.मी. एकूण२०५७मि.मी. पाऊस झाला असून धरणात ९०.०३% पाणी साठा व २५० क्यूसेकने विसर्ग सुरू आहे
भाटघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ६ मि.मी. एकूण ८०३मि.मी. पाऊस झाला असून धरणात १००% पाणी साठा झाला आहे.
नीरा - देवघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात २६ मि.मी. एकूण १७३४ मि.मी. पाऊस झाला असून धरणात ९०.२७ % पाणी साठा झाला असून ६१३९ क्यूसेकने विसर्ग सुरू आहे
वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मि.मी. एकूण २६६ मि.मी. पाऊस झाला असून धरणात ९२.८४ % पाणी साठा झाला असून १५२६१ क्यूसेकने विसर्ग सुरू आहे
चारही धरणात मिळून ९५.४९% पाणीसाठा झाला चार धरणात एकूण ४६ टीएमसी पाणीसाठा असून मागील २४ तासात चारही धरणात मिळून ४ टीएमसी पाण्याची आवक झाली आहे