फलटण चौफेर दि २४
निरा खोऱ्यातील पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला असून आज सकाळी ६ वाजेपर्यंत भाटघर, निरा देवघर वीर व गुंजवणी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेला पाऊस पुढीलप्रमाणे झालेला पाऊस पुढीलप्रमाणे गुंजवणी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ३६ मि.मी. एकूण२२१७मि.मी. पाऊस झाला असून धरणात ९१.१६% पाणी साठा व २५० क्यूसेकने विसर्ग सुरू आहे
भाटघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ६८ मि.मी. एकूण ९८६मि.मी. पाऊस झाला असून धरणात १००% पाणी साठा झाला आहे धरणातून १६३१ क्यूसेकने विसर्ग सुरू आहे नीरा - देवघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ३३ मि.मी. एकूण १९०५ मि.मी. पाऊस झाला असून धरणात ९८.७१ % पाणी साठा झाला असून ७५० क्यूसेकने विसर्ग सुरू आहे वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात २७ मि.मी. एकूण ३८३ मि.मी. पाऊस झाला असून धरणात १०० % पाणी साठा झाला असून वीर धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने सकाळी ११ वाजता निरा नदीमध्ये वीर धरणाच्या निरा डाव्या कालव्याच्या अतीवाहका द्वारे ३०० क्युसेक्स विसर्ग सुरू करण्यात आलेला विसर्ग तसाच ठेऊन निरा उजव्या कालव्याच्या अतीवाहकाद्वारे १००० क्युसेक्स विसर्ग सुरू करण्यात आला आहे. वीर धरणाच्या सांडव्याद्वारे २३१८५ क्यसेक्स एवढा विसर्ग सुरू करण्यात येत आहे. आता निरा नदीमध्ये काहीकाळ एकूण विसर्ग २४४८५क्युसेक्स विसर्ग सुरू आहे