फलटण चौफेर दि २३
फलटण शहर पोलीस व उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्याकडील निर्भया पथकाने मुधोजी हायस्कूल येथे २८ बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करत १९ हजार ४०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे याबाबत फलटण शहर पोलीस स्थानकातून मिळालेल्या अधिक माहितीनुसार,आज सकाळी ९ ते ११.३० वाजता मुधोजी हायस्कूल, फलटण शहर येथे फलटण शहर पोलीस ठाणे व उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांचे कडील निर्भया पथकाने केलेल्या संयुक्त कारवाईत मोटर वाहन कायद्यांतर्गत २८ जणांकडून दंड आकारण्यात आला आहे व १९ विद्यार्थ्यांचे समुपदेशन आणि १३ व्यक्तीवर कलम ११०/११७ महाराष्ट्र पोलीस अधिनियम कारवाई करण्यात आली आहे या कारवाईत फलटण शहर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस उपनिरीक्षक सुरेश शिंदे, पो.शि.पांडुरंग धायगुडे, ऋषिकेश खरात, मारुती लोलापोड, संभाजी जगताप सुरज परिहार आणि निर्भया पथकतील महिला पोलीस हवालदार वैभवी भोसले, पोलीस नाईक फैयाज शेख, पो.शि. दत्तात्रय भिसे, संध्या वलेकर यांनी सहभाग घेतला.