फलटण चौफेर दि १८
मागील पंधरा ते वीस दिवसापासून उघडीप दिलेल्या पावसाने आज फलटण तालुक्याच्या पश्चिम भागात जोरदार हजेरी लावली. फलटण तालुक्यातील आदर्की, सालपे, हिंगणगाव, सासवड, सुरवडी, निंभोरे मुळीकवाडी, घाडगेवाडी , तरडगाव भागात आज सायंकाळी सात वाजल्यापासून जोरदार पावसाने हजेरी लावली सुमारे दोन तासापासून जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या मागील आठ ते दहा दिवसापासून तापमानामध्ये वाढ झाली होती त्यामुळे वातावरणामध्ये प्रचंड उखाडा जाणवत होता सध्या खरिपाच्या हंगामामध्ये असणाऱ्या बाजरी, सोयाबीन व आडसाली उसासाठी हा पाऊस गरजेचा असल्याने या पावसाने शेतकरी वर्गांने समाधान केले मात्र अचानक आलेल्या पावसाने चाकरमान्यांची व वाहनधारकांची तारांबळ उडाली