Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

श्रीमंत रामराजेंच्या प्रयत्नातून हिंगणगाव येथे नवीन सबस्टेशन मंजूर- धैर्यशील अनपट

 


फलटण चौफेर दि १७

  विधान परिषदेचे माजी सभापती आ श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर,आ दीपकराव चव्हाण,  श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत रघुनाथ राजे नाईक निंबाळकर  यांच्या माध्यमातून हिंगणगाव येथे नवीन सब स्टेशन ( अंदाजपत्रकीय रक्कम ४ कोटी ७८ लक्ष ५४ हजार रुपये फक्त ) या कामाला सुरुवात होणार असून जागा हस्तांतरणास  जिल्हाधिकारी सातारा यांनी परवानगी दिली असून गेल्या पाच वर्षापासून केलेल्या पाठपुरावाला यश  आले असल्याचे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य धैर्यशील अनपट यांनी सांगितले हिंगणगाव विभागातील सर्व शेतकरी बांधवांना यापुढे  विना खंडित  वीजपुरवठा होणार आहे  या कामासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल श्रीमंत रामराजे, आमदार दिपकराव चव्हाण व गायरानातील जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल ग्रामपंचायत हिंगणगाव, ग्रामस्थ व महावितरणच्या सर्व अधिकाऱ्यांचे धैर्यशील अनपट यांनी आभार मानले 

 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.