फलटण चौफेर दि ६
फलटण पुसेगाव रोडवरील वाठार फाटा ता फलटण येथील श्री बाबा सुपर बझार या दुकानाचा लोखंडी पत्राच्या शेडचा पत्रा उचकटून अज्ञात चोरट्यांनी दुकानातील तब्बल १ लाख ९७ हजार १७० रुपयांचे किराणामालाचे साहित्य व रोख रक्कम चोरून नेल्याची घटना घडली आहे याबाबत अज्ञात चोरट्यावर फलटण ग्रामीण पोलिस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे गुन्ह्याची फिर्याद हनुमंत भिमराव सरक वय ४५ रा मिरगाव यांनी दिली आहे याबाबत फलटण ग्रामीण पोलीस स्थानकातुन मिळालेल्या अधिक माहितीनुसार
दि.३ ऑगस्ट रोजी रात्री ९ ते दि ४ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान वाठारफाटा ता. फलटण याठिकाणी फलटण ते पुसेगाव रस्त्यावरील फिर्यादी हनुमंत भीमराव सरक वय ४५ रा मिरगाव व अश्विन दोशी यांच्या मालकीच्या श्रीबाबा सुपर बझारचे लोखंडीचे पत्र्याचे शेडचे पत्रा उचकटुन कोणीतरी अज्ञात चोरट्यांने बझार मध्ये प्रवेश करुन बझार मधील किराणा मालाचे साहीत्य १ लाख ९७ हजार १७०रुपयाचे साहीत्य चोरुन नेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हुलगे करीत आहेत