फलटण चौफेर दि २४ बदलापूर येथे घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने संत गाडगे महाराज प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळा खराडेवाडीव तालुका फलटण येथे निर्भया पथकाचा प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यात आला यावेळी मुलींना आपण वावरत असताना आपल्या आजूबाजूला आपल्याबद्दल काही चुकीचे घडत असेल तर आपण निर्भया पथक यांच्याशी संपर्क साधने जरुरीचे आहे. अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नये आपली गोपनीय माहिती कोणालाही देऊ नये मुलींनी आपल्या सुरक्षिततेसाठी जुडो.कराटे कुस्ती बॉक्सिंग. सारखे खेळ खेळणे आवश्यक आहे तसेच मुलींनी सोशल मीडियाचा वापर काळजीपूर्वक करावा तसेच गुड टच, बॅड टच बाबत माहिती दिली तसेच त्यांनी कोमल व बक्षी अंकल यांची शॉर्ट फिल्म मुलींना दाखवण्याबाबत मार्गदर्शन केले मुलींनी घाबरून न जाता निर्भया हेल्पलाइन नंबर 100/112/1091 .1098 तसेच मो.नं.7387241091 या नंबर वर तक्रार करण्याचे आव्हान केले कार्यक्रमास, निर्भया पथक प्रमुख वैभवी भोसले, दत्तात्रय भिसे यांनी मुलींना केले यावेळी आश्रमशाळेचे संचालक तसेच दोन्ही विभागाचे मुख्याध्यापक ,महिला अधीक्षक सर्व शिक्षक कर्मचारी वृंद उपस्थित होता