फलटण चौफेर दि २३
सातारा शहरातील प्रतापसिंग नगरातील सराईत गुन्हेगार अजय ऊर्फ लल्लन जाधव व टोळी सदस्य, राजु उर्फ बन्टी नवनाथ लोमटे, ओंकार भारत देढे, विकास रमेश खुडे, ऋत्वीक उर्फ रोहित लक्ष्मण उकीडें, मधुरमा दत्तात्रय जाधव, अनिता दत्तात्रय जाधव, दत्तात्रय उर्फ गद-या काशीनाथ आसवरे, जय अमर कांबळे सुनिल सुखदेव वाघमारे, मच्छिद्र उर्फ टकल्या भागवत बोराटे, किरण नागनाथ उकिर्डे, सागर रामा खुडे, विजय उर्फ बबल्या जाधव, पमी उर्फ पमीता दत्तात्रय बोराटे उर्फ जाधव, सुनिता दत्तात्रय जाधव सर्व रा. प्रतापसिंहनगर, खेड ता.जि. सातारा यांनी एकत्र मिळुन हातात तलवारी, कोयते, लाकडी दांडकी घेवुन फिर्यादीचे घरावर दगडफेक करुन फिर्यादीचे घराचा दरवाजा तोडुन आत प्रवेश करुन फिर्यादीचे मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करुन फिर्यादीचे पोटात तलावर भोकसुन फिर्यादीस जखमी केले तसेच टोळी प्रमुख व टोळी सदस्य यांनी हातात तलवारी, कोयतं, लाकडी दांडकी घेवुन प्रतापसिंहनगर खेड सातारा येथे दहशत माजवत गाडयाच्या काच फोडुन नुकसान करुन टोळी प्रमुख अजय ऊर्फ लल्लन जाधव याने मी प्रतापसिंहनगर चा दादा आहे माझ्या नादाला लागला तर जिवंत सोडणार नाही असे म्हणुन दहशत केली. म्हणून वगैर दिले तक्रारीवरुन सातारा शहर पोलीस ठाणेत गुन्हा रजि. नोंद करण्यात आलेला आहे.
सदर गुन्हयाच्या तपासामध्ये टोळी प्रमुख अजय ऊर्फ लल्लन जाधव रा. प्रतापसिंहनगर, खेड ता.जि. सातारा व त्यांचे साथीदारांनी टोळीची दहशत निर्माण करुन आपल्या आर्थिक व इतर फायदयाकरीता संघटीतपणे गुन्हे केलेले असल्याचे निष्पन्न इ शालेने पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के, सातारा शहर पोलीस ठाणे यांनी नमुद टोळी विरुध्द दाखल असलेल्या गुन्हयांची माहिती संकलित केली असता त्यांचेवर जुलुम जबरदस्ती करुन हिंसाचाराची धमकी देऊन किंवा अन्य अवैध्द मार्गाने दहशत व बळाचा वापर करुन खुनाचा प्रयत्न करणे, खंडणी मागणे, चोरी करणे, जबरी चोरी करणे, दरोडा टाकणे, दरोडयाची तयारी करणे, जबर दुखापतीसह दरोडा टाकणे, घरफोडी, शासकीय कामात अडथळा आणणे, विनयभंग करणे, बलात्कार करणे, जबर दुखापत करणे, अपहरण, गृह अगळीक करणे, गर्दीमारामारी, हद्दपारी आदेशाचे उल्लंघन करणे, शिवीगाळ करणे, दमदाटी करणे, अशा प्रकारचे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याने सदर आरोपीचेविरुध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अन्वये कारवाई करीता मा. पोलीस अधीक्षक, सातारा यांचे मार्फतीने मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापुर परिक्षेत्र कोल्हापुर यांच्याकडे मोक्का अंतर्गत प्रस्ताव सादर केला होता सुनिल फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापुर परिक्षेत्र कोल्हापुर यांनी सदर घटनेची पडताळणी करुन सदर गुन्हेगारीची वाढती दहशत मोडीस काढुन सामान्य जनतेच्या मनातील भीती नष्ट करण्यासाठी सदर टोळीविरुध्द दाखल असलेल्या गुन्हयांचे कागदपत्रांचे अवलोकन करुन मोक्का प्रस्तावाची पडताळणी करुन सदर गुन्हयास मोक्का कायदयान्वयेचो कलम वाढ करणेची परवानगी देवून गुन्हयाचा पुढील तपास श्री. राजीव नवले उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा विभाग सातारा यांच्याकडे देण्यात आलेला आहे.
माहे नोव्हेंबर २०२२ पासून १० मोक्का प्रस्तावामध्ये १२८ इसमांविरुध्द मोक्का कायदयाअंतर्गत कारवाई केली असुन १०१ इसमांविरुध्द हददपार करणेत आलेले आहे. तसेच भविष्यातही सातारा जिल्हयामधील सराईत गुन्हेगारांचे विरुध्द मोक्का, हददपारी, MPDA अशा प्रकारच्या कठोर कारवाई करणेत येणार आहेत.
मोक्का प्रस्ताव मंजूरी करीता श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक, सातारा व आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक, सातारा, यांचे मार्गदर्शनाखाली राजीव नवले उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा विभाग सातारा, अरुण देवकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा, पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के सातारा शहर पोलीस ठाणे, सपोनि नितीन केणेकर सातारा शहर पोलीस टाणे, पो.हवा अमित सपकाळ नेम- स्थानिक गुन्हे शाखा सातारा.पो.हवा. श्री देशमुख, संदीप पवार, प्रसाद जाधव, म.पो.ना. पदमिनी जायकार, सुनिता देकने पो.कॉ. अमोल सापते, रोहीत पवार, अजित फरांदे, श्रीकांत बामणे नेम- सातारा शहर पोलीस ठाणे या पोलीस अंमलदारांनी मोक्का कारवाईकरीता सहभाग घेतला