फलटण चौफेर दि १५फलटण तहसील कार्यालयाच्या आवारात नेमून दिलेल्या जागेव्यतिरिक्त इतर ठिकाणी विनापरवाना लिखाणाच्या कामासाठी बसणाऱ्या लेखनिकांवर नियमांचे उल्लंघन केल्यास साहित्य जप्त करून फौजदारी कारवाई करण्याचा इशारा तहसीलदार डॉक्टर अभिजीत जाधव यांनी दिला आहे फलटण मुद्रांक विक्रेता संघटच्याकडून तहसीलदारांना विनापरवाना बसणाऱ्या लेखनिकांवर कारवाई करण्याबाबत निवेदन देऊन दि ९ तारखेपासून मुद्रांक विक्री बंद आंदोलन करण्यात आले होते यावर कार्यवाही करत तहसीलदारांनी कारवाई दाखल हा आदेश काढला आहे
तहसीलदारांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की,फलटण तहसिल कार्यालयाच्या आवारात विनापरवाना अनाधिकृतपणे काही व्यक्ती बसत असून, त्यांचेकडून दर पत्रकाप्रमाणे आकारणी केली न जाणे, पक्षकाराकडून जास्त पैसे आकारणी केली जाणे, अशा प्रकारच्या तक्रारी जनतेकडून वारंवार प्राप्त होत तसेच त्यांचेकडे परवाना नसलेमुळे त्यांचेवर प्रशासनास थेट नियंत्रण ठेवता येत नाहीत, तसेच अधिकार गृहाचे आवारात ते कोणत्याही ठिकाणी बसून कामकाज करत असलेने वाहतूकीस वारंवार अडथळा निर्माण होत आहे. त्याचप्रमाणे असे अनाधिकृत व्यक्ती बसणेच्या ठिकाणाच्या लगत फलटण ट्रेझरी मध्ये डेमो EVM VVPAT ची स्ट्रॉग रुम असलेने त्याच्या सुरक्षिततेचा मुददा देखील उपस्थित होत असून अधिकारगृह फलटणच्या आवारात विनापरवाना कामकाज करणारे सर्व खाजगी लेखणीकार यांनी अधिकार गृहाच्या उत्तर प्रवेशद्वारालगत पश्चिम कंपाऊडजवळ बसून कामकाज करावयाचे आहे अन्यथा अशा व्यक्ती यांचेकडील सर्व सामान जप्त करुन फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम १३३ नुसार यांचे विरुध्द कायदेशिर कारवाई केली जाईल असा इशारा दिला आहे