आज व्हॅलेंटाईन डे प्रेमाचा दिवस, प्रेम म्हणजे श्रद्धा प्रेम म्हणजे आपुलकी आपण कुणावरही, कुठल्याही गोष्टीवर, जेव्हा प्रेम करतो, तेव्हा आपलं तिच्याशी आस्था, श्रद्धा, आणि आपुलकीचे नाते, जुळून जातं.
या भावना व्यक्त करण्यासाठी शब्दांची आवश्यकता पडत नाही, प्रेम व्यक्तीच्या कृतीतूनच व्यक्त होत असतं, प्रेम फक्त मुला मुलींचे असतं असंच नाहीतर, आई वडिलांचे मुलांवर खूप प्रेम असतं, बहिण भावांचे प्रेम असतं, शालेय मुलांच्या मनात गुरूं बद्दल आदर युक्त प्रेम असते, प्रेमात जात, धर्म, व्यक्ती, वस्तू सजीव- निर्जीव, या कुठल्याही एका गोष्टीचा कधीच विचार केला जात नाही. आपणच आपल्यावर मनापासून प्रेम करू लागलो तर आपल्याला खऱ्या प्रेमाचाही अर्थ समजायला लागतो
प्रेमात कधी वासना येत नाही, वासना हा मोह आहे, आकर्षण आहे स्वार्थ आहे ते तुम्हाला इतर गोष्टीकडे खेचते परंतु केवळ फायद्यासाठी त्यात त्याग नसतो श्रद्धा नसते आपुलकीही नसते.
प्रेम हा अडीच अक्षरी शब्द खूप काही सांगून जातो.
आज वेगवेगळ्या वृत्तपत्रांमधून विनयभंग बलात्कार एकतर्फी प्रेमातून घडणाऱ्या घटना समाजासमोर येत आहेत, तसेच गुन्हे नोंदवण्याचे प्रमाणही वाढले आहे, घटना आधीही घडत होत्याच, त्याविरुद्ध तक्रार नोंदवण्याची मुलींची व पालकांची मानसिकता आता झालेली आहे.
घटना घडल्यानंतर गुन्हा दाखल करणे, व त्याची निष्पक्ष व जलद गतीने चौकशी होणे गरजेचे आहे, पण गरज आहे, या घटना का घडत आहेत ? याचे, *घटना घडल्यानंतर तत्कालीक उपाययोजना करण्याबरोबर त्या घडूच नयेत यासाठी दक्षता घेतली पाहिजे, स्त्री- पुरुषा बद्दलची आपली भावना व जाणीव सन्मानाची समानतेची आहे का ? आपण अशा प्रकारच्या घटनेला नकळत मदत तर करत नाही ना ? महिला, वृद्ध, बालक, यांना असुरक्षित वाटेल, अशा घटना घडत असताना, आपण बघ्याची भूमिका तर घेत नाही ना ? एक ना एक असे अनेक प्रश्न समोर आहेत, गुन्ह्यांना प्रतिबंध व्हावा म्हणून पोलीस यंत्रणा असली तरी, आपण एक समाजाचे दक्ष जबाबदार नागरिक म्हणून आपली ही काही कर्तव्य आहेत, समाजाने कृतीशील झालं पाहिजे
सगळ्यात मूलभूत प्रश्न तो आपण आपल्या मुला-मुलींना संस्कार देताना, घरात मुलगा व मुलगी भेदभाव करतो, मुलाचा मागेल तो हट्ट पुरा करताना, मुलींकडे जाणून बुजून दुर्लक्ष करतो, नकळतच त्यांना दुय्यम भूमिका देतो, स्त्री पुरुष समान आदराची भूमिका घेतली पाहिजे, मुला इतकीच मुलीलाही निर्भय बनवण्याची शिकवण घराघरातून दिली पाहिजे, स्त्रियां संबंधात गुन्हे फक्त समाजात घडतात असे नव्हे तर, कुटुंबात होणारे अन्याय अत्याचार होत असताना, त्याच कुटुंबातील अनेक वयो वृद्ध स्त्रिया, व पुरुषांचा, त्यातील सहभाग व्यतीत करणाऱ्या व तितकाच चिंतेत टाकणारा आहे.
कायदा व न्याय यंत्रणेच्या मर्यादांमुळे, गुन्हेगाराला धाक वाटत नाही,
स्त्री विषयक मानसिक परीक्षण घराघरातून व्हायला पाहिजे नुसत्या कायद्याने नाही ?
शब्दांकन
श्री. रविंद्र परशुराम वेदपाठक साखरवाडी. ता. फलटण. जि. सातारा. फोन.९९७०७४९१७७