तरडगाव(नवनाथ गोवेकर) तरडगाव तालुका फलटण येथील ग्रामपंचायत चे वार्डनिहाय आरक्षण चिट्टी टाकून शुक्रवारी जाहीर करण्यात आले. दरम्यान सरपंच पद हे यापूर्वीच खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित जाहीर करण्यात आले आहे. राजकीय दृष्ट्या या ग्रामपंचायतीचा तालुक्यात कायम दबदबा राहिलेला आहे. दरम्यान या वार्ड आरक्षण बद्दल कोणाच्या हरकती असल्यास त्या १६ फेब्रुवारी पर्यंत द्याव्यात असे सांगण्यात आले.
मंडलाधिकारी राहुल खाडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत वार्ड नुसार आरक्षण जाहीर करण्यात आले. यावेळी गावकामगार तलाठी किशोर वाघ, ग्रामसेवक सुनील धायगुडे, पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. या आरक्षण सोडतीतून वार्डात बदल झाल्याचे व अनुसूचित जातीचे आरक्षण पहिल्यांदाच दुसऱ्या वार्डात गेल्याचे दिसले.
वार्ड नुसार आरक्षण पुढील प्रमाणे, श्रीराम वार्ड क्र १- ओबीसी पुरुष, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण खुला, विठ्ठल वार्ड क्र २ - अनुसूचित जाती पुरुष, सर्वसाधारण महिला,ओबीसी पुरुष, लक्ष्मी वार्ड क्र ३ - सर्वसाधारण महिला २ , सर्वसाधारण खुला, भैरवनाथ वार्ड क्र ४ - ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला,सर्वसाधारण खुला, सावता वार्ड क्र ५ - ओबीसी महिला,सर्वसाधारण महिला,सर्वसाधारण खुला असे आरक्षण जाहीर करण्यात आले.
निवडणुकीसाठी अनेकजण जनसंपर्क वाढवण्यावर भर देत आहेत. तर काहीजण गाठीभेटीतून जनमत चाचणी घेत आहेत.