आज कोणतेही वर्तमानपत्र उघडताच गावो गावच्या, अत्याचाराच्या, छेडछाडीच्या, बातम्या, त्या विरोधात उभी राहिलेली सज्जनशक्ती, स्थानिक आंदोलने, प्रसारमाध्यमातून या विषयाला मिळालेली चालना, यामुळे बलात्कार विरोधी कायद्यामध्ये झालेले बदल, अशा अनेक गोष्टी घडल्या,
स्वतःचे रक्षण स्वतः करण्यासाठी स्त्रिया, मुलींना संरक्षण प्रशिक्षण देण्यासाठी पुढाकार घेतला गेला, रास्त बदल झाला आहे, तो समाजाच्या दृष्टिकोनात कोणत्याही घटनेनंतर संतापाचे विरोधाची जी लाट निर्माण होते, ती चळवळ काय, संघटना काय, परत परत तसीच आंदोलने करणार, प्रसार माध्यमांमधून त्याचे पडसाद उमटणार, पण आजही स्त्रियांच्या सुरक्षिततेची हमी देता येत नाही ?
एका बाजूला शिक्षण, व अर्थार्जन यातून आलेला आत्मविश्वास, आलेली संधी, आणि दुसऱ्या बाजूला काळजी, निराशा, शंका, आणि हतबलता, अशा *नकारात्मक भावनांचा सामना आजच्या प्रत्येक स्त्रीला करावा लागतो.तो तिच्या आत्मविश्वासावर घाला घालतोय, पालकांची ही काळजी दूर करायला घर, समाज, पोलीस, न्याय, या यंत्रणाही पुरेशा नाहीत, ही हतबलतेची जाणीव निराश करणारी आहे, आत्तापर्यंत समोर आलेल्या अनेक घटनांपैकी व अशा बातम्या पाहिल्या तर लक्षात येते, मित्र काका, मामा, शिक्षक, ड्रायव्हर, शेजारी, कुणापासूनही मुलगी सुरक्षित नाही. असं सर्वत्रिक अविश्वासाचे वातावरण आजूबाजूला आहे, ओळखीच्या व्यक्तीने विश्वासघात केल्याचे प्रमाण मोठे आहे,
ज्या भारतीय संस्कृतीने परस्त्री मातेसमान मानली, त्याच भारतीय संस्कृतीत हे तन कसे रुजले, फोफावले, ह्याला खतपाणी कोण घालतय,! याचा सर्वसमावेशक विचार आपण कधी करणार ?
प्रत्येक घटनेनंतर वरवरच्या मलमपट्टीने ही स्थिती बदलणार नाही, सर्व संस्कृतीत वेगवेगळ्या परिस्थितीत स्त्रियांवर अन्याय अत्याचार झाल्याचे पुरावे आहेत, शिक्षण, मान, सन्मान, दर्जा नाकारून स्त्रीला दुबळे केलेले आहे, विविध कार्यालयातून स्त्रियांना द्विआरथी बोलणे, अश्लील विनोद, करणे याला सामना करावाच लागतो,रस्त्याने जाता येता, एसटी स्टँडवर, वकवलेल्या नजरांना त्यांना रोज सामना करावा लागतो, यांच्यासारख्या आपल्या आया बहिणी असताना, आपण कोणत्या थराला जातो, याचंही भान आपल्याला यायला हवं !
स्त्रियांवरील अन्यायाच्या विरोधात स्त्री-पुरुषांनी मिळून आवाज उठवायला हवा, कारण स्त्रियांचे प्रश्न हे फक्त स्त्रियांचेच नाहीत तर संपूर्ण समाजाचे आहेत, प्रश्नग्रस्त स्त्रीचे वडील, भाऊ, नवरा, मित्र, व अन्य नातेवाईक हे त्या प्रश्नाची संबंधित असतात, अशा प्रकारचे समाज परिवर्तन घडवून आणण्याची प्रभावशाली संघटना नाही, त्यात स्त्रियां तर अजिबात संघटित नाहीत, त्या घर, गल्ली, जात समाज, अशा विभागलेल्या असतात, म्हणून कायद्यात कितीही बदल झाले तरी स्त्रिया असुरक्षितच आहेत.
एखाद्या अबला विद्यार्थिनीवर ज्याला आपण पूज्य मानला जातो, शिक्षक तिच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन अत्याचार करतो, शिकवण्याच्या भहाण्याने निरनिराळ्या प्रसंगातून विनयभंग करतो, हे केवढे त्याचे धाडस, एखाद्या उच्चपदस्थ स्त्रीवर तिच्या गाडीचा ड्रायव्हर हे कृत्य करतो, कारण कायद्याचा धाक राहिला नाही,
आणि जोपर्यंत अशा घटनांबाबत जागृत समाज पेटून उठत नाही, तोपर्यंत कायदा बळकट होणार नाही.
स्त्री संघटना बळकट करायला आजच्या सुशिक्षित प्रभावशाली स्त्रिया पुढे येत नसतील तर, स्त्री सुरक्षा सारख्या धोरणात्मक मुद्द्याला बळकटी येणार कशी ? कारण स्त्रियांनाच आपल्या अस्तित्वासाठी लढायला हवं ! बहुसंख्य स्त्रिया प्रापंचिक जबाबदाऱ्याच्या ओझ्याखाली दबलेल्या असल्यामुळे अशा संघटनांमध्ये सक्रिय होऊ शकत नाहीत, संघटना बळकट करण्यासाठी आजच्या सुशिक्षित, प्रभावशाली, स्त्रिया पुढे आल्या तरच स्त्री सुरक्षिते सारख्या धोरणात्मक मुद्द्याला बळकटी येईल.
नाहीतर समाज नुसता उघड्या डोळ्यांनी पाहतच राहणार घटना घडतच राहणार.
सखोल विचारमंथन व्हायला हवं !
शब्दांकन
श्री. रविंद्र परशुराम वेदपाठक साखरवाडी. ता. फलटण. जि. सातारा. फोन.९९७०७४९१७७