फलटण चौफेर दि १३फलटण तहसिल आवारामध्ये मागील अनेक दिवसांपासून काही विना परवाना धारक व्यक्ती लिखाणाचे, तिकीट विक्रीचे काम करीत असून तालुक्यातुन येणाऱ्या गोरगरीब जनतेचे आर्थिक शोषण करीत आहेत. याबाबत सातारा जिल्हाधिकारी, उपविभागिय अधिकारी फलटण व तहसीलदार फलटण यांचेकडे वारंवार तोंडी व लेखी निवेदने दिली असुन त्याबाबत अद्यापही कोणतीही कार्यवाही झालेली नाही त्यामुळे उपरोक्त विषयाबाबत फलटण तालुका मुद्रांक विक्रेता संघटने कडून दिनांक ९ पासून मुद्रांक व लेखणीचे कामबंध आंदोलन करण्यात आले आहे फलटण तहसील आवारात मागील बऱ्याच वर्षांपासून विनापरवाना धारक व्यक्ती लेखणीचे तसेच तिकीट विक्रीचे काम करीत असून या विरोधात फलटण तालुका मुद्रांक विक्रेता संघटनेच्या वतीने मागील दोन वर्षापासून शासन पातळीवर विनापरवाना धारक लेखणीचे व मुद्रांक विक्रेतेचे काम करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे देऊन सुद्धा शासनाने कोणतेही कारवाई न केल्याने दिनांक ९ फेब्रुवारी पासून संघटनेच्या वतीने मुद्रांक विक्री व लेखणीचे काम बंद आंदोलन सुरू केले आहे यामुळे तालुक्यातून विविध कामानिमित्त तहसील व प्रांत कार्यालयालात येणाऱ्या नागरिकांची मुद्रांक,तिकीट उपलब्ध होत नसल्याने मोठी गैरसोय होत आहे